शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

Eugenie Bouchard: आयकार्डवर छापला बिकीनीतला फोटो; अखेर स्पर्धेच्या ऑर्गनायजरने केली मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 19:20 IST

महिला खेळाडूने थेट इन्स्टाग्रामवर शेअर केलं ओळखपत्र

Eugenie Bouchard: कॅनडाची महिला टेनिस स्टार युजेनी बुकार्ड तिच्या खेळाव्यतिरिक्त तिच्या ग्लॅमरस लूकमुळे खूप चर्चेत आहे. तिचे लूक्स आणि स्टाइल एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीत. बुकर्ड सोशल मीडियावरही कायम चर्चेत असते. युजेनी बुकार्ड आज काल ओडलम ब्राउन व्हॅन ओपन टूर्नामेंट संदर्भातील एका घटनेमुळे जास्त चर्चेत आहे. टूर्नामेंट अधिकार्‍यांनी तिच्या ओळखपत्रावर थेट स्विमसूट म्हणजेच बिकिनीतील फोटो लावला. याबाबत तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून राग व्यक्त केल्यानंतर अखेर ऑर्गनायजरने याची दखल घेतली.

ओडलम ब्राउन व्हॅन ओपन टूर्नामेंटमध्ये बुकार्ड सहभागी होणार होती. त्यासाठीच्या ओळखपत्रावर स्विमसूट परिधान केलेले चित्र पाहिल्यावर ती संतापली. तिने तिच्‍या इंस्‍टाग्राम स्‍टोरीवर त्‍याचा एक फोटो शेअर केला आणि विचारले, 'कृपया, कोणी मला याविषयी प्रकाराविषयी नी स्पष्टीकरण देऊन समजावू शकेल का?' मात्र, या कॅप्शनसह बुकार्डने हसणारा एक इमोजी टाकला होता. त्यामुळे ती संतप्त असली तरी तिने ती परिस्थिती शांततेने हाताळली. यानंतर ओडलम ब्राऊन व्हॅन ओपन टूर्नामेंटच्या अधिकाऱ्यांनी आपली चूक सुधारली. त्याने बुकार्डचा पासपोर्ट साईज नवा फोटो लावला. त्या संदर्भातील फोटोही बुकार्डने शेअर केला आणि खाली कॅप्शन लिहिले की, आता मला माझं खरं फोटोवालं ओळखपत्र मिळालं.

बुकार्डने स्वत:चे अनेक बिकिनीमधील फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे तिचा तसा फोटो आयकार्ड वर आल्यावरही तिने शांततापूर्ण पद्धतीत प्रकरण हाताळले. यावर्षी १ जुलै रोजी कॅनडा दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी बुकार्ड लाल बिकिनीमध्ये बीचवर सेलिब्रेशन करताना दिसली. तिने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. त्यानंतर हे फोटो चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल झाले होते.

--

२८ वर्षीय युजेनी बुकार्ड गेल्या वर्षी जखमी झाली होती. जून २०२१ मध्ये तिच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून ती काही काळ खेळापासून दूर होती. तिला यावेळी विम्बल्डनमध्येही खेळता आले नाही. ती माजी विम्बल्डन फायनलिस्ट (२०१४ मध्ये) आहे. बुकार्डचे जागतिक क्रमवारीतील सर्वोत्तम स्थान पाचवे आहे. सध्या तिच्या क्रमवारीत बरीच घसरण झाली आहे. बुकार्डने २००९ मध्ये खेळायला सुरुवात केली. कोणत्याही ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी खेळणारी ती पहिली कॅनडाची खेळाडू ठरली होती.

टॅग्स :TennisटेनिसSocial Mediaसोशल मीडियाViral Photosव्हायरल फोटोज्Social Viralसोशल व्हायरल