शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
5
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
6
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
7
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
8
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
9
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
10
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
11
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
12
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
13
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
14
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
15
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
16
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
17
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
18
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
19
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
20
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल

ऑफिसमध्ये टी ब्रेक घेणं अन् वेळेवर घरी जाणं तरूणाला पडलं महागात, २० दिवसात नोकरी गमावली! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:04 IST

Viral News : गुरुग्राम येथील एका स्टार्टअपमधून या तरूणाला त्याच्या नोकरीच्या २० दिवसांनीच काढून टाकण्यात आलं.

Viral News : नोकरी लागणं ही सगळ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बाब असते. नोकरी लागली जबाबदाऱ्या वाढतात, सोबत हाती पैसेही यायला लागतात. अशात नोकरी टिकवण्यासाठी लोक वाट्टेल ते करत असतात. कामावर फोकस करतात. तेव्हा कुठं तुमची नोकरी टिकून राहते. पण तुमचा काहीच फायदा होत नसेल तर कंपनी तुम्हाला बाहेर रस्ता दाखवते. तुमचं काम चांगलं नसल्यावर तुम्हाला कंपनीनं काढणं एक वेळ ठीक आहे. पण एखाद्या शुल्लक कारणामुळे तुम्हाला नोकरीहून काढलं तर नक्कीच वाईट वाटतं. एका तरूणासोबत असंच काहीसं झालं. या तरूणाला त्याच्या कंपनीनं केवळ २० दिवसात नोकरीहून काढलं. कारण वाचाल तर तुम्हीही अवाक् व्हाल.

गुरुग्राम येथील एका स्टार्टअपमधून या तरूणाला त्याच्या नोकरीच्या २० दिवसांनीच काढून टाकण्यात आलं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर त्यानं याची माहिती दिली असून कंपनीनं त्याच्यावर 'अ‍ॅटिट्यूड प्रॉब्लेम' असल्याचा आरोप केला. आपली ओळख जाहीर न करता त्यानं सांगितलं की, त्यानं नोकरी जॉइन केल्यापासून समस्या सुरू झाली होती. त्याला अजिबात कळत नव्हतं की, त्याला असं का लेबल लावलं जात आहे. त्यानं लिहिलं की, "मला समजलं नाही. मी त्यांना म्हटलं की, माझ्यात अ‍ॅटिट्यूड नाही. मी तरीही यावर काम करेन. पण त्यानं मला असं काही म्हटलं हेच माझ्या लक्षात आलं नाही".

चहासाठी ब्रेक घेणं खटकलं

तरूणानं पुढे आरोप लावला की, त्याच्या बॉसला मी इतर दोन सहकाऱ्यांसोबत टी ब्रेक घेण्याची समस्या होती. कथितपणे बॉस तरूणाला म्हणाला की, "ग्रुप बनवू नका, हे कंपनीसाठी चांगलं नाही". त्यानंतर बॉस आणखी एक अडचण होती. शिफ्ट संपल्यानंतर ऑफिसमधून वेळेवर निघण्यावरून बॉसनं त्याला हटकलं होतं. तरूणाला बॉस म्हणाला होता की, "तू बरोबर ७ वाजता निघत आहे, हे बरोबर नाहीये".

२०व्या दिवशी त्याला त्याच्या डेस्कऐवजी डायरेक्टरच्या कॅबिनमधून काम करण्यास सांगण्यात आलं. तो म्हणाला की, "अशाप्रकारे डायरेक्टरच्या कॅबिनमध्ये बसून कोण काम असतं?". पण तरीही त्यानं बॉसचं ऐकलं. यादरम्यान त्यानं सहकारी टी ब्रेकसाठी जात आहेत की नाही हे बघण्यासाठी कॅबिनबाहेर नजर टाकली. या गोष्टीचा डायरेक्टरला राग आला. डायरेक्टर संतापला आणि म्हणाला की, "तू बाहेर का बघत आहेस? मी इथं बोलत आहे". त्यानंतर डायरेक्टर एचआरला सांगून लगेच मला नोकरीहून काढलं. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके