शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

ऑफिसमध्ये २० मिनिटं उशिरा पोहोचला म्हणून कंपनीने कामावरून काढून टाकलं, मग 'त्याच्या' सहकाऱ्यांनी जे केलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 19:51 IST

७ वर्षात कर्मचारी पहिल्यांदाच उशिरा आला होता

Late in Office: एखाद्या दिवशी जर तुम्ही ऑफिसला थोडं उशिरा पोहोचलात तर बॉसचा ओरडा खाऊ नये म्हणून आपण बरीच कारणं मनात तयार ठेवतो. महिन्यात एक-दोन वेळा ऑफिसमध्ये पोहोचायला उशीर तर सगळ्यांनाच होतो. एखादा कर्मचारी दररोजच उशिरा येत असेल तर बॉस त्याच्यावर चिडणं, संतापणं हे क्रमप्राप्तच आहे. पण अमेरिकेतील फ्लोरिडा मध्ये एक विचित्र घटना घडली. एका ऑफिसमध्ये जे घडलं ते वाचल्यावर तुम्ही क्वचितच ऑफिसमध्ये उशिरा पोहोचण्याची चूक कराल. वाचा नक्की काय घडलं.

एक कर्मचारी एका ऑफिसमध्ये सात वर्षांपासून काम करत होता. त्या कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये पोहोचायला २० मिनिटं उशिर झाला. सामान्यपणे एखादा कर्मचारी ऑफिसात पहिल्यांदाच उशिरा पोहोचल्यास कंपनी प्रशासन त्याला समज देऊन पुढे अशी चूक होणार नाही याची काळजी घेण्यास सांगते. पण या कर्मचाऱ्याला मात्र त्याच्या ७ वर्षांच्या नोकरीत पहिल्यांदाच २० मिनिटं उशिरा पोहोचण्याचा चांगलाच फटका बसला. पहिल्यांदाच ऑफिसात २० मिनिटं उशिरा पोहोचल्याने त्या कर्मचाऱ्याला कंपनीने थेट नोकरीवरूनच काढून टाकल्याची धक्कादायक घटना घडली.

कर्मचाऱ्याच्या सहकाऱ्यांचा कौतुकास्पद निर्णय

कर्मचारी एकदा उशिरा आल्याने त्याला कंपनीतूनच काढून टाकण्याच्या निर्णयाचा त्याच्या सहकाऱ्यांनी चांगलाच निषेध केला. 'नो स्टॉप इट स्टेप ब्रो' नावाच्या युजरने 'रेडिट' (Reddit) या 'अँटीवर्क फोरम' (Antiwork forum) वर एक मोठी पोस्ट लिहून एक कौतुकास्पद निर्णय जाहीर केला. 'आमचा एक सहकारी गेली ७ वर्षे आमच्या बरोबर कंपनीत काम करत होता. ७ वर्षांत तो कधीच ऑफिसमध्ये उशिरा आला नव्हता. पण पहिल्यांदा ऑफिसात उशिरा आल्याने त्याला कंपनीतूनच काढून टाकल्याचे आम्हाला समजलं आहे. ही घटना मागच्याच आठवड्यात घडली आहे. आम्हाला सोमवारी याबद्दल माहिती मिळाली. २० मिनिटं उशिरा आल्याने त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. आता उद्या आम्ही सर्व कर्मचारी ऑफिसला उशिराने येणार आहोत. आणि जोपर्यंत आमच्या त्या सहकाऱ्याला पुन्हा नोकरीवर रूजू करून घेतलं जात नाही त्या दिवसापर्यंत आम्ही रोज उशिराच येणार आहोत.' ही इंटरनेट पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टला आतापर्यंत ७८ हजार जणांनी अपवोट (लाईक) केलं आहे. तसेच, ४ हजारांहून अधिक लोकांनी कमेंट करून त्या सहकाऱ्याला पाठिंबा दर्शवला आहे. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाEmployeeकर्मचारीSocial Viralसोशल व्हायरलAmericaअमेरिका