शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: रशिया-युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनमधील चिमुकलीनं गायलं हृदयस्पर्शी गाणं, एकुन डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 16:24 IST

कीव ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्य सतत बॉम्बचा वर्षाव करत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत, ज्यात चहूबाजूंला विध्वंसाचं दृश्य दिसत आहे. अशा परिस्थितीत एका बंकरमध्ये आश्रय घेत असलेल्या मुलीचा व्हिडिओ सध्या ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे.

युक्रेन आणि रशिया यांच्यातील विनाशकारी युद्ध (Ukraine Russia War) सलग १२ व्या दिवशीही सुरूच आहे. कीव ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्य सतत बॉम्बचा वर्षाव करत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत, ज्यात चहूबाजूंला विध्वंसाचं दृश्य दिसत आहे. अशा परिस्थितीत एका बंकरमध्ये आश्रय घेत असलेल्या मुलीचा व्हिडिओ सध्या ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे (Emotional Video of Little Ukrainian Girl).

या व्हिडिओमध्ये मुलगी एक गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी भावुक झाले असून संतापही व्यक्त करत आहेत. लोक रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना शिव्या देत आहेयांच्याबद्दल राग व्यक्त करत आहेत आणि सवाल करत आहेत की, या निष्पाप लोकांनी तुमचं काय वाईट केलं?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रशियन बॉम्बहल्ल्यापासून वाचण्यासाठी मुलगी आणि तिचे कुटुंबीय बंकरमध्ये लपलेले दिसत आहेत. त्याच्याशिवाय आणखी अनेक लोक तिथे आहेत. व्हिडिओमध्ये ती मुलगी 'लेट इट गो' हे प्रसिद्ध गाणं गुणगुणताना दिसते. हे गाणं फ्रोजन याचित्रपटातील आहे. मुलीचा हा १ मिनिट ४६ सेकंदाचा व्हिडिओ सर्वांचंच लक्ष वेढत आहे. मात्र, या मुलीचं गाणे ऐकून बहुतांश युजर्सचे डोळे पाणावले आहेत. लोक युक्रेनमध्ये राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी आणि युद्ध लवकरात लवकर संपावे यासाठी प्रार्थना करत आहेत. व्हिडिओमधील मुलीचं नाव अमेलिया असल्याचं सांगितलं जात आहे.

रशियन हल्ल्याच्या भीतीने लोकांनी बंकरमध्ये आसरा घेतल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. यात तुम्ही लोकांचे रडतानाचे आवाजही ऐकू शकता. विशेष म्हणजे, अमेलियाने 'लेट इट गो' गाणं सुरू करताच सगळे शांत बसतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी तो कधी आणि कुठे शूट झाला याबाबत विचारणाही केली आहे. मात्र, अनेकांनी त्याला प्रत्युत्तर देताना लिहिलं आहे की, रशिया चौफेर हल्ले करत असताना हे लोक कुठे आहेत हे विचारू नका. अशा परिस्थितीत त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया