शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलच! भारतात टोमॅटोचा 'भाव' वाढला; मग थेट दुबईवरून मागवलं १० किलोचं पार्सल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 18:43 IST

देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्याचे चित्र आहे.

देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळत आहे. टोमॅटोचा वाढता भाव पाहता अनेक भन्नाट गोष्टी समोर येत आहेत. भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत, तर विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती देखील यावर व्यक्त होत आहेत. एकेठिकाणी तर टोमॅटो सांभाळण्यासाठी बाऊन्सर ठेवल्याचे चित्र दिसले. टोमॅटोचे भाव वाढल्याने झालेल्या गदारोळानंतर सरकारने त्याचा भाव ८० रुपये प्रतिकिलो केला आहे. तरीदेखील लोक अजूनही अधिक स्वस्त टोमॅटो मिळतात काय त्याच्या शोधात आहेत. थेट दुबईतून मागवले टोमॅटोदरम्यान, एका महिलेने दुबईत राहणाऱ्या तिच्या मुलीकडून १० किलो टोमॅटो मागवले असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित महिलेची मुलगी सुट्टीनिमित्त मुलांसोबत भारतात येणार आहे. म्हणूनच भारतात टोमॅटोचा अधिक भाव असल्याने या महिलेने थेट दुबईतून टोमॅटो मागवले. आईच्या मागणीनुसार, मुलीने १० किलो टोमॅटो पॅक करून भारतात पाठवले. टोमॅटो पाठवणाऱ्या मुलीच्या बहिणीने ट्विटरवर ही माहिती दिली.  

नेटकऱ्यांनी घेतली फिरकी टोमॅटो दुबईतून मागवल्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देऊन आई आणि मुलीच्या नात्याचे मिश्किलपणे कौतुक करत आहेत. एका युजरने म्हटले, "या महागाईच्या काळात सर्वोत्कृष्ट कन्येचा पुरस्कार बहुधा त्या मुलीच्या दिशेनेच जात आहे." तर, "मुलगी तिच्या आईला दुबईला का घेऊन जात नाही आणि भारतात टोमॅटोचे भाव खाली येईपर्यंत तिथे का ठेवत नाही?", असेही काहींनी म्हटले आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInflationमहागाईIndiaभारतDubaiदुबई