शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

धरणात स्टंटबाजी करणं पडलं महागात; व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 12:07 IST

राजकोटमधील तरूणाला धरणाच्या पाण्यात कारचा स्टंट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

राजकोट-  राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचे सत्र सुरू आहे. पावसामुळे नाले, ओढे यासह मोठमोठी धरणे तुडूंब भरून वाहत आहेत. मात्र यापासून दूर राहील ती तरुणाई कसली, अनेक तरुण पाण्याच्या ठिकाणी स्टंटबाजी करण्यासाठी हजेरी लावतात. गुजरात मधील राजकोट येथील न्यारी धरणात धोकादायक कार स्टंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याशिवाय अन्य दोन जणांचा देखील तपास सुरू आहे. १२ जुलै रोजी या तरूणाने पाण्याच्या मोठ्या प्रवाहात कार नेऊन स्टंटचा व्हिडीओ काढला होता. 

राजकोटमधील स्थानिक पोलिस कॉंस्टेबल शिवभद्रसिंग गोहिल यांनी घटनेची माहिती देताना संबंधित तरुणाने कारचा स्टंट करून व्हिडीओ इंस्टाग्रावर पोस्ट केला होता असे म्हटले. या तरुणाचे नाव सत्यजीत सिंग जाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. सत्यजित सिंग जालाने पोलिसांना माहिती देताना म्हटले, "११ जुलैला मी माझे मित्र रवी वेकारिया, स्मित सखिया छयांशू सगपरिया आम्ही आमचा मित्र अर्जुनसिंग जडेजाच्या कारमध्ये पावसाचा आनंद घेण्यासाठी न्याहारी धरणाजवळ एकत्र आलो होतो. धरणाच्या वरील भागात जास्त पाऊस झाल्यामुळे खालील बाजूस पाण्याचा प्रवाह जास्त होता, धरणाच्या एका टोकाला पाण्याची पातळी कमी होती म्हणून स्मितने पाण्यात गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. छयांशू आणि रवीने गाडीच्या दोन्ही बाजूला उभे राहून गाडी खोल पाण्यात नेली."

व्हिडीओ व्हायरल होताच तरुणाला अटकदरम्यान, स्टंटचा थरार सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी आम्ही व्हिडीओ काढली असे सत्यजित सिगंने सांगितले. हा व्हिडीओ त्यानेच त्याच्या इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता ज्याच्यानंतर त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. पोलिस कॉन्स्टेबलने सांगितले की, राजकोट पोलिसांनी छयांशू सगपरियाला कारसह अटक केली आहे तसेच रवी आणि स्मितचा शोध सुरू आहे, ते गुरुवारी संध्याकाळी तक्रार दाखल झाल्यापासून फरार आहेत. लक्षणीय बाब म्हणजे व्हायरल झालेला व्हिडीओ सोशल मीडियावरून डिलीट करण्यात आला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामArrestअटकGujaratगुजरात