शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: कुत्र्यांनी साथीदाराला अनोख्या अंदाजात दिला शेवटचा निरोप, पाहुन अश्रु होतील अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 11:21 IST

सोशल मीडियावर श्वानांचे निरनिराळे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात तर काही व्हिडिओ भावुक करणारे, जे पाहूनच डोळ्यात पाणी येतं.

प्राण्यांमध्येही माणसांप्रमाणेच भावना, समजूतदारपणा, दया हे गुण असतात. पाहणाऱ्यांना त्यांच्यातील हे चांगले गुण नेहमीच दिसतात (Animal Lovers). मात्र न पाहणाऱ्यांना प्राण्यांमध्ये काहीच विशेष दिसत नाही. विशेषतः कुत्र्याबद्दल बोलायचं झालं तर या प्राण्याला अतिशय ईमानदार प्राण्यांमध्ये गणलं जातं. कित्येक वर्षांपासून त्यांना मनुष्याचा जवळचा मित्र म्हटलं जातं. सोशल मीडियावर श्वानांचे निरनिराळे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात तर काही व्हिडिओ भावुक करणारे, जे पाहूनच डोळ्यात पाणी येतं.

सध्या असाच एक इमोशनल व्हिडिओ (Emotional Video of Dogs) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात श्वानांनी केलेलं काम पाहून तुम्हीही नक्कीच थक्क व्हाल. व्हिडिओमध्ये दिसतं की काही श्वानांनी आपल्या एका साथीदाराचं निधन झाल्यानंतर त्याला जमिनीत पुरलं. तुम्ही पाहू शकता, की खड्ड्यामध्ये एक मृत श्वान पडलेला आहे आणि त्याच्या चारही बाजूने इतर श्वान आहेत. हे सर्व त्याच्यावर माती टाकत आहेत आणि त्याला दफन करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हा व्हिडिओ इमोशनल करणारा आहे. व्हिडिओ पाहून समजतं की प्राण्यांमध्येही प्रेमाची भावना आणि समजूतदारपणा भरपूर आहे. आयएएस अधिकारी अवनिश शरण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी आश्चर्यचकीत होऊन या व्हिडिओला कॅप्शन दिलं, की 'हे प्राणीच आहेत का?'. अवघा ४५ सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत दीड लाखाहून अधिकांनी पाहिला आहे तर ११ हजारहून अधिकांनी लाईक केला आहे.

लोक या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट करत आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, कुत्र्यांना नेहमी पायाने माती फेकताना पाहिलं, मात्र या व्हिडिओमधून त्यांच्या भावना समजतात. आणखी एकाने लिहिलं, यापेक्षा चांगला शेवटचा निरोप आणखी काय असू शकतो. प्राणी माणसांपेक्षा जास्त प्रामाणिक आणि संवेदनशील असतात.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरdogकुत्रा