शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

प्लास्टिकच्या बॉटलमध्ये अडकलं कुत्र्याचं तोंड, वेळ आली कापण्याची...अन् मग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 20:03 IST

अनेक वेळा प्लास्टिक प्राण्यांसाठी मोठ्या अचडणीचं कारण ठरतं. असंच काहीसं घडलं एका कुत्र्यासोबत. या कुत्र्याच्या डोक्यात प्लास्टिकची बाटली अडकली. ज्यामुळे कुत्र्याचा जीव जाण्याची वेळ आली. 

जगभरात अजूनही प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. यामुळे केवळ माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही त्रास सहन करावा लागतो. बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल की, अनेक वेळा प्लास्टिक प्राण्यांसाठी मोठ्या अचडणीचं कारण ठरतं. असंच काहीसं घडलं एका कुत्र्यासोबत. या कुत्र्याच्या डोक्यात प्लास्टिकची बाटली अडकली. ज्यामुळे कुत्र्याचा जीव जाण्याची वेळ आली. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये, काही सायकलस्वार फिरायला बाहेर असल्याचं दिसतं. पण या दरम्यान त्यांना वाटेत एक कुत्रा दिसतो, ज्याचं डोकं एका कोल्डड्रिंकच्या बाटलीत अडकलेलं असतं. कुत्र्याचा जीव धोक्यात असल्याचे पाहून तिन्ही सायकलस्वार त्याच्याजवळ जातात. आणि ती अकडलेली बाटली कापून त्याची सुटका करतात. डोक्यातून बाटली निघाल्यानंतर कुत्र्याला खूप बरं वाटतं.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण व्हिडिओमधल्या तिघांचंही कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ Mack & Becky Comedy ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. बातमी लिहीपर्यंत हा व्हिडिओ ५ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला होता. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाdogकुत्राTwitterट्विटर