Dog Viral Video: कुत्रे फक्त पाळीव प्राणीच नाही, तर कुटुंबाचा भाग आहेत. आपल्या मालकाचा जीव वाचवण्यासाठी कुत्रे काहीही करू शकतात. कधीकधी तर कुत्रे मालकासाठी स्वतःचा जीवदेखील धोक्यात घालतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मालकाला वाचवण्यासाठी एका पाळीव कुत्र्याने चक्क डायनामाइट(बॉम्ब) खाऊन टाकला.
पेरु देशातील हुआराल येथे ही चकीत करणारी घटना घडली आहे. पत्रकार कार्लोस अल्बर्टो मेसियास झारेट यांच्या घरी रात्रीच्या अंधारात एका अज्ञात व्यक्तीने डायनामाइटची कांडी टाकली. त्यांच्या घरातील पाळीव कुत्र्याने धोका ओळखला आणि आपल्या जीवाची पर्वा न करता जळत्या डायनामाइटला तोंडात पकडून विझवले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
सुदैवाने डायनामाइट फुटले नाही, अन्यथा पाळीव कुत्रा मुंचिसचे तुकडे झाले असते. ही घटना घडली, तेव्हा घरात १० लोक झोपलेले होते. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स त्या कुत्र्याचे खूप कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले, हा खूप धाडसी कुत्रा आहे. त्यांच्यामुळे आज संपूर्ण कुटुंब सुरक्षित आहे. दुसऱ्याने म्हटले, कुत्रे हे मानवांचे सर्वोत्तम आणि निष्ठावंत मित्र आहेत. त्यांना धोका काय आहे हे माहित असतो, तरीही ते मालकासाठी आपले प्राण पणाला लावतात.