शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कुत्र्याने चित्त्याला दिली अशी टफ फाईट की Viral Video पाहुन अंगावर काटा उभा राहिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 15:50 IST

सोशल मीडियावर एक अतिशय आश्चर्यकारक व्हिडिओ (Viral Video of Dog) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एका कुत्र्याने असं काही करून दाखवलं, जे पाहून तुम्हीही त्याचं कौतुक कराल.

चपळता असलेले अनेक प्राणी आहेत. मात्र तरीही चपळता हा शब्द आला की प्रत्येकजण चित्ताचंच उदाहरण देतो. कारण चित्त्यासारखी अद्भूत चपळता क्वचितच इतर कोणत्या प्राण्यात दिसते. त्यामुळेच या क्रूर शिकाऱ्याने कोणावर हल्ला केल्यास त्या प्राण्याचं वाचणं जवळपास अशक्यच असतं. मात्र सध्या सोशल मीडियावर एक अतिशय आश्चर्यकारक व्हिडिओ (Viral Video of Dog) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एका कुत्र्याने असं काही करून दाखवलं, जे पाहून तुम्हीही त्याचं कौतुक कराल.

व्हिडिओमध्ये एका चित्त्याने कुत्र्यावर हल्ला केल्याचं पाहायला मिळतं (Cheetah attack on Dog). मात्र, कुत्र्यानेही हार न मानता शेवटपर्यंत चित्त्याविरोधात लढा दिल्याचं पाहायला मिळतं. इंटरनेटवर सध्या या कुत्र्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता, की जंगलातून भटकलेला एक चित्ता रहिवासी भागात शिरतो. यानंतर चित्ता काळ्या रंगाच्या एका कुत्र्याला आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करतो. यानंतर कुत्रा जे काही करतो, ते पाहून तुम्हीही नक्कीच त्याचं कौतुक कराल.

आपल्यापेक्षा कितीतरी पटीने ताकदवर असलेल्या प्राण्यासोबत हा कुत्रा लढा देतो. यात चित्त्याने कुत्र्याची मान आपल्या जबड्यात पकडल्याचं दिसतं. मात्र तरीही कुत्रा चित्त्याचा सामना करताना दिसतो आणि तो शेवटपर्यंत हार मानत नाही. अखेर चित्ताच तिथून धूम ठोकतो.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर nature27_12 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. 12 जानेवारीला अपलोड झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर काही यूजर्सनी कुत्र्यासाठी चिंता व्यक्त केली आहे. तर काहींचं असं म्हणणं आहे की या कुत्र्याने अतिशय धाडसाने चित्त्याचा सामना केला आहे.

काही यूजर्स त्या व्यक्तीवर भडकले आहेत, ज्याने कुत्र्याचा आणि चित्त्याचा हा व्हिडिओ शूट केला आहे. यूजर्सचं असं म्हणणं आहे, की त्या व्यक्तीने चित्त्याला तिथून पळवून लावायला हवं होतं. यावर प्रतिक्रिया देत काही यूजर्सनी म्हटलं की चित्त्यासारख्या हिंस्त्र प्राण्याचा सामना कोण करेल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामdogकुत्रा