शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

कडक सॅल्यूट! गोरगरिब मुलांना शिक्षण देण्यासाठी संपूर्ण पगार खर्च करतोय 'हा' खाकीतला देवमाणूस

By manali.bagul | Updated: January 8, 2021 17:09 IST

Trending News in Marathi : २०१० पासून पोलिस दलात भरती झालेले अमित मुलांना सरकारी नोकरीसाठी शिक्षण देण्याचे काम करत आहेत.

(Image Credit- The Better india) 

या जगात अनेक माणुसकीचे दर्शन घडवत असलेल्या घटना खूप कमीवेळा घडतात. काही माणसं आपल्या कुटुंबाच्या आणि नोकरीच्या जबाबदाऱ्या पूर्ण  करत असताना समाजातील गोरगरिबांसाठी काही करत असतात. अशाच एका पोलिस अधिकाऱ्याचे कार्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोलिसाने गोरगरिबांसाठी केलेलं काम पाहून सोशल मीडिया युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

या फोटोतील पोलिस अधिकारी हरियाणातील सोनीपतमधील रहिवासी असून गोरगरिब मुलांना अभ्यासासाठी मदत करत आहेत. यांचे नाव अमित लाठिया आहे. २०१० पासून पोलिस दलात भरती झालेले अमित मुलांना सरकारी नोकरीसाठी शिक्षण देण्याचे काम करत आहेत. यांना गोरबरिब, अनाथ मुलांचा मसिहा असं सुद्धा म्हटलं जात आहे. 

बेटर इंडियाशी बोलताना अमित यांनी सांगितलं की, ''मी लहान असताना अनेक समस्यांचा सामना करावा लागयचा. कोचिंग क्लाससाठी पैसै नसायचे, तेव्हा मी पार्ट टाईम नोकरी केली. देशसेवेची इच्छा असल्यामुळे पोलिस  भरतीत जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पोलिसात भरती झाल्यानंतर मला सगळ्यात आधी चंदिगड येथे काम पाहावं लागलं. त्यानंतर दिल्ली पोलिसात माझी बदली झाल्यानंतर मी लहान मुलांना शिकवण्याचं ठरवलं.'' 

अशी झाली या कामाची सुरूवात

एकदा अमित सोनिपतमधील एका रिक्षात बसले होते. तेव्हा एक १७- १८ वर्षांचा मुलगा रिक्षा चालवत होता.  अमित यांनी अनेकदा या मुलाला रिक्षा चालवताना पाहिलं. या मुलाशी बोलल्यानंतर त्यांना कळलं की तो १२ वी  पास आहे. पण घरची स्थिती फारशी बरी नसल्यामुळे त्याने रिक्षा चालवायचं ठरवलं. या मुलाचे नाव विनय असून आज अमित यांच्या प्रयत्नांमुळे विनय हरियाणा पोलिसमध्ये कार्यरत आहे. 

दोघी बहिणींच्या शरीरात होत्या ३ किडन्या; जन्माला येताच डॉक्टरांनी केली होती मृत्यूची भविष्यवाणी अन् आता..

विनय व्यतिरिक्त आणखी दोन मुलांना अमित यांनी मार्गदर्शन केले. अरूण आणि संजीत अशी या मुलांची नावं असून यांच्या शिक्षणाचा सगळा खर्च अमित यांनी उचलला. एक एक करून जवळपास ३० मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली.  १०० मुलांची जबाबदारी घेतली असून त्यातील ३० मुलं आज सरकारी नोकरीत कार्यरत आहेत. सध्या २५ मुलांना अमित शिकवत असून या मुलांच्या शिकवणीसाठी सोनिपतमध्ये घर घेतले आहे. 

लय भारी! न्हाव्याला मुलगी झाली अन् आनंदाच्या भरात साऱ्या गावाला मोफत सर्व्हीस दिली

अमित यांनी सांगितले की, ''मी माझा संपूर्ण पगार या मुलांच्या शिक्षणासाठी देतो. जर माझी दिवस पाळी असेल तर रात्री आणि रात्र पाळी असेल तर दिवसा या मुलांना मी शिकवतो. अभ्यासाबरोबरच सरकारी नोकरीसाठी मी त्यांच्याकडून रोज अर्धा तास व्यायामही करून घेतो. मुलांनी पुढे जावं आणि नोकरी मिळवून स्वत: च्या पायावर उभं राहावं हेच माझं उद्दीष्ट आहे. कारण कमाईचं साधन मिळालं तर या मुलांच्या कुटुंबाचं आयुष्य बदलू शकतं. ''

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलPoliceपोलिसJara hatkeजरा हटके