बाबो! रस्त्यावर आली पॉर्श डान्सिंग Scorpio कार’; अन् पोलिसांनी लावला ४१ हजाराचा दंड

By manali.bagul | Published: January 1, 2021 01:18 PM2021-01-01T13:18:33+5:302021-01-01T13:32:46+5:30

Trending Viral News in Marathi : कार पाहून वाहतूक पोलिसांनी तब्बल  ४१ हजार ५०० रूपयांचा दंड लावला आहे. विशेष म्हणजे या कारवर जातीचा उल्लेखसुद्धा करण्यात आला होता. 

Dancing scorpio car seized by up police in ghaziabad owner fined rupees | बाबो! रस्त्यावर आली पॉर्श डान्सिंग Scorpio कार’; अन् पोलिसांनी लावला ४१ हजाराचा दंड

बाबो! रस्त्यावर आली पॉर्श डान्सिंग Scorpio कार’; अन् पोलिसांनी लावला ४१ हजाराचा दंड

Next

सोशल मीडियावर एका स्कॉर्पीओ कारचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  आतापर्यंत अशी कार तुम्ही कधीही पाहिली नसेल.  साधीसुधी नाही तर ही चक्क डान्स करणारी कार आहे. म्हणूनच या कारला सोशल मीडियावर डान्सिंग कार असं म्हटलं जात आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण ही कार पाहून वाहतूक पोलिसांनी तब्बल  ४१ हजार ५०० रूपयांचा दंड लावला आहे. विशेष म्हणजे या कारवर जातीचा उल्लेखसुद्धा करण्यात आला होता. 

आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी डान्सिंग कारचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. रविवारी उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद पोलिसांकडे काही तरुण रस्त्यावर कर्कश्य आवाजात गाणी वाजवत असून स्टंट देखील करत असल्याची तक्रार आली होती. समोर आलेल्या माहितीनुसार नसूम अहमद असं गाडीच्या मालकाचं नाव असून तो दिल्लीचा रहिवासी आहे. त्याने आपली स्कॉर्पिओ कस्टमाइज केली होती. आतून-बाहेरुन त्याने गाडी सजवली होती, तसेच मोठमोठे स्पीकरही लावले होते. PM मोदींच्या फॅन झाल्या आजीबाई; अन् गाणं 'अस' गायलं की जगभरात झाल्या VIRAL

चालकाने ब्रेक मारल्यानंतर ही कार जोरानं हलत होती, त्यामुळे बघणाऱ्याला ती डान्सिंग कारप्रमाणे वाटायची. या गाडीच्या दिसण्यामुळे तसंच कर्कश्य आवाजामुळे अनेक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले होते.  म्हणूनच उत्तर प्रदेश पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून  यानंतर कोणी कार, ट्रॅक्टर किंवा बुलेट अशा प्रकारे सजवल्यास कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. New Year 2021 : माहामारीची भविष्यवाणी करणाऱ्या बिल गेट्स यांनीच सांगितलं; कसं असेल नववर्ष २०२१ 
 

Web Title: Dancing scorpio car seized by up police in ghaziabad owner fined rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.