शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आज्जी जोमात नेटकरी कोमात! असा काही नागीन डान्स केला की तुमचे हसुन पोट दुखेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 18:45 IST

एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तुम्ही नागिन डान्सचे भरपूर व्हिडीओ पाहिले असतील पण असा व्हिडीओत कदाचित पहिल्यांदाच पाहाल. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू बिलकुल आवरणार नाही

नाचता येत नसलं तरी नागिण डान्स हा प्रत्येकाला येतो (Naagin dance funny video). त्यामुळे लग्न असो का इतर कोणताही कार्यक्रम यावेळी डान्स प्रोग्राममध्ये नागिण डान्स पाहायला मिळतोच. पुंगीचा आवाज ऐकू यायला लागला की काही लोक नागिणीसारखे डोलू लागतात. एक गारूडी बनतो आणि एक नाग. मग दोघांचा सुरू होतो तो नागिण डान्स. नागिण डान्सचे असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तुम्ही नागिन डान्सचे भरपूर व्हिडीओ पाहिले असतील पण असा व्हिडीओत कदाचित पहिल्यांदाच पाहाल. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू बिलकुल आवरणार नाही (Old woman naagin dance video).

नागिण डान्समध्ये जसं आपण म्हटलं दोन व्यक्ती समोरासमोर असतात. एक गारूडी आणि एक नाग. या व्हिडीओत गारूडी आणि नागाची जोडी आहे ती आजी-नातवाची. नातू गारूडी बनला आहे तर आजी नागिण. पुंगीचा आवाज ऐकताच आजीबाईने नागिणीचा अवतार घेतला आणि आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या गारूडी नातवालाच ती डसली (Grandmother grandson naagin dance video).

व्हिडीओत पाहू शकता बरेच लोक दिसत आहेत. नागिण गाण्याची धून ऐकायला येत आहे. एक तरुण आणि त्याच्यासोबत काही महिला नाचताना दिसतात. त्यानंतर हा तरुण आपल्या आजीला घेऊन येतो. तेव्ह सर्वजण बाजूला होतात. मध्ये फक्त आजी आणि नातू उभे असतात. आजी-नातू समोरासमोर उभे राहतात. नातू आपल्याजवळील रूमालाचं एक टोक तोंडात धरतो आणि दुसरं टोक हातात. रूमालाची पुंगी करून तो पुंगीसारखी गाण्याच्या तालावर फिरवतो.

आजी सुरुवातीला शांत उभी असते. ती काही करणार नाही असं वाटतं. पण नंतर आजी आपला जलवा दाखवतो. नातू गारूडी होऊन पुंगी वाजवू लागताच आजीसुद्धा नागिणीचा अवतार घेता. हाताचा नागोबा करत ती डोलू लागते. तिच्या चेहऱ्यावरील हावभावही पाहण्यासारखे आहेत. तिने डोळे थोडे मोठे केले आहेत, चेहऱ्यावर बिलकुल हसू नाही. एखादी नागिण जशी रागात असावी तसाच तिचाही चेहरा पाहायला मिळतो.

पुढे आजी जे करतं ते यापेक्षाही धक्कादायक आहे. ती नाचता नाचता नातवाला दंश करताना दिसते. आपल्याला तालावर नाचायला लावणाऱ्या गारूडी नातवावर ती नागिण डान्स करताना हल्ला करते. एक-दोन नाही तर किती तरी वेळा ती अशी डसताना दिसताना. यावेळी बऱ्याचदा तिचा नातू जमिनीवर कोसळतोही. तोसुद्धा पुन्हा पुन्हा उभा राहून पुंगी वाजवताना दिसतो. तिथं उपस्थित लोकही आजीचा जोश पाहून हैराण होतात.

Anshul yadav shikohabad यूट्यूब युझरने आपल्या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. नेटिझन्सनाही नागिण आजीचा अंदाज आवडला आहे. व्हिडीओवर बऱ्याच मजेशीर कमेंटही येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाYouTubeयु ट्यूब