शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:55 IST

Cylinder Gas Leak Video: सोशल मीडियावर या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Cylinder Gas Leak Video: तुम्ही घरगुती सिलिंडरचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. सध्या अशाच प्रकारच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सिलिंडरमधून गॅस गळती झाल्यानंतर एक महिला घराबाहेर पळताना दिसते, परंतु काही वेळाने ती परत घरात येते, तेवढ्यात भीषण स्फोट होतो. सुदैवाने या घटनेत महिलेला काही इजा झाली नाही. व्हिडिओचे कुठला आहे आणि आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.

व्हिडिओ व्हायरलसोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक महिला स्वयंपाकघरातून गॅस गळती होणारे सिलिंडर बाहेर ओढताना दिसते. परंतु, गॅस गळती जास्त झाल्यामुळे ती सिलिंडर तिथेच सोडून पळून जाते. सिलिंडरला जोडलेल्या पाईपमधून गॅस वेगाने बाहेर पडत असल्याचे स्पष्टपणे व्हिडिओत दिसत आहे. काहीवेळानंतर गॅस बाहेर पडण्याचे बंद होते. 

काही वेळानंतर महिला दुसऱ्या दाराने पुन्हा घरात येते. एक पुरुषही गॅस गळती पाहण्साठी घरात येतो. पण, तेवढ्यात भीषण स्फोट होऊन सर्वत्र आग लागते. यानंतर दोघेही तात्काळ घरातून पळून जातात. या घटनेची भीषणता व्हिडिओ पाहूनच समजून येईल. सुदैवाने महिला किंवा त्या पुरुषाला गंभीर इजा झाली नाही. घराचे खिडक्या आणि खोलीचे दार उघडे असल्याने फारसे नुकसान झाले नसल्याचे मानले जाते.

हा व्हिडिओ घर के कलेश नावाच्या एक्स अकाउंटवरुन 22 जून रोजी पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडिओला आतापर्यंत 17.7 मिलियनहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत. तसेच, या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि विविध कमेंट्सही करण्यात आल्या आहेत.  

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलCylinderगॅस सिलेंडरBlastस्फोट