शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: कुत्र्याच्या पिल्लाला वाटतंय समोर उभा आहे त्याचा शत्रु, पण समोर आहे...'ही' गोष्ट; पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 13:19 IST

अशीच एक कुत्र्याच्या पिल्लाची एकदम क्युट मस्ती सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हे पिल्लु आरशात स्वत:ला पाहतंय पण आरशात आपणच आहोत असं त्याला वाटतं नाहीये म्हणून ते स्वत:शीच म्हणजे आरशातल्या प्रतिमेशी भांडत आहे.

लहान कुत्रे इतके क्युट असतात की त्यांना पाहताच अगदी प्राणीप्रेमी नसलेल्या व्यक्तींच्या मनातही माया दाटुन येते. त्यांच गोजिरं रुप एखाद्या लहान बाळासारखं वाटतं. त्या लहान पिल्लांना पाहुन कोणालाही त्यांना उचलून घ्यावसं वाटतं, लाड करावेसे वाटतात. ते असतातही लहान बाळासारखेच. अगदी तशी मस्ती करतात. दंगा करतात. पुन्हा पुन्हा त्यांच्या बाललीलांनी आपल्याला त्यांच्या प्रेमात पडायला भाग पाडतात.

अशीच एक कुत्र्याच्या पिल्लाची एकदम क्युट मस्ती सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हे पिल्लु आरशात स्वत:ला पाहतंय पण आरशात आपणच आहोत असं त्याला वाटतं नाहीये म्हणून ते स्वत:शीच म्हणजे आरशातल्या प्रतिमेशी भांडत आहे. त्याला असं वाटतंय ते दुसरं कुत्र आहे. या गोड पिल्लाची गंमत पाहुन आपल्याला मजा येते. हसू आवरत नाही.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की ते पिल्लु आरशात स्वत:ला पाहतं. त्याला तिथं दुसरा कोणीतरी आपल्यासारखाच हुबेहुब दिसणारा कुत्रा आहे असं वाटतं. ते त्या प्रतिमेकडे पाहुन भुंकायला सुरुवात करतं. कदाचित या पिल्लाला स्वत:ला आरशात पाहुन कुतुहलही वाटत असाव की नेमकं हे काय आहे. हे जर दुसरं कुत्र असेल तर ते आपल्याकडे का पाहातंय? आपण जसे हावभाव करतोय तसंच का करतंय? असे अनेक प्रश्न त्याला पडत असतील. आणि ते ते भुंकुन व्यक्त करत असेल.

या व्हिडिओला काही तासांतच ९ लाखापेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत. लोक अनेक कमेंट्स करत आहेत. काहीजण विचारत आहेत की हा व्हिडिओ काढणारी व्यक्ती नेमकी कुठे उभी आहे? आरशात तर ती दिसत नाही? Buitengebieden या ट्वीटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर