पत्नीला आजारपणात साथ देण्यासाठी 'त्यानं' केलं असं काही, पाहून डोळे पाणावतील...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 05:57 PM2020-04-09T17:57:43+5:302020-04-09T18:03:37+5:30

कठीण प्रसंगात आपण आपल्या पत्नीच्या सोबत जाऊ शकत नाही याचं त्यांना दुःख वाटतं.

CoronaVirus : love story of wife and husband in coronavirus lockdown days myb | पत्नीला आजारपणात साथ देण्यासाठी 'त्यानं' केलं असं काही, पाहून डोळे पाणावतील...

पत्नीला आजारपणात साथ देण्यासाठी 'त्यानं' केलं असं काही, पाहून डोळे पाणावतील...

Next

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशासह भारतात सुद्धा लॉकडाऊन करण्यात आलं आहे.  लॉकडाऊनमुळे लोकांचा कोरोनापासून बचाव होत असला तरी अनेकांचे  हाल होत आहेत. कोणालाही आपल्या जवळच्या व्यक्तींना, नातेवाईकांना, भेटता येत नाही.  तर काही लोक स्वतःच्या घरापासून सुद्धा लांब आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका लॉकडाऊनमुळे दुरावलेल्या दाम्पत्यांबद्दल सांगणार आहोत. 

डोळ्यात पाणी आणणारा हा फोटोआहे.  या माणसाच्या पत्नीला कमोथेरेपी घ्यावी लागते. त्यासाठी आठड्यातून काही दिवस त्यांना दवाखान्यात ट्रिटमेंटसाठी जावं लागतं. कॅन्सरवर उपचार असलेली कमोथेरेपी ही अतिशय वेदनादायक ट्रिटमेंट आहे. त्या महिलेसोबत नेहमी तिचा नवरा असायचा. मात्र कोरोनामुळे आता सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागत आहे. त्यामुळे सध्या त्याला तिच्यासोबत त्या कठिण काळात राहता येत नाही. बायकोला एकटीलाच केमोथेरेपीसाठी जावं लागत आहे. कठीण प्रसंगात आपण आपल्या पत्नीच्या सोबत जाऊ शकत नाही याचं त्यांना दुःख वाटतं.

यावर तोडगा म्हणून या माणसाने चांगलीच शक्कल लढवली आहे. पत्नी उपचारसाठी क्लिनिकमध्ये गेल्यावर तो क्लिनिकच्या बाहेर आपली कार पार्क करतो आणि खुर्ची टाकून पुस्तक वाचत बसतो. आपल्या खुर्ची समोर त्याने एका मोठ्या बोर्डवर जे लिहिलंय ते वाचून सगळेच तिथं थांबतात आणि त्याचं एकमेकांवर असलेलं प्रेम पाहून कौतुक करतात. 

"I can't be with you but I'm here loving you!" असं त्याने त्या बोर्डवर लिहिलेलं आहे. या बोर्डवरील वाक्य वाचून या माणसाच्या त्यांच्या पत्नाीवर असलेलं प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त होत आहे.

Web Title: CoronaVirus : love story of wife and husband in coronavirus lockdown days myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.