शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Corona virus : 'डोकं जड होऊन डोळ्यांमध्ये वेदना, कडवट तोंड', कोरोनाग्रस्त महिलेने सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 1:00 PM

छातीवर दगड ठेवल्यासारखं वाटत होतं. कोरोना व्हायरसच्या जाळ्यातून सुखरूप सुटका झालेल्या एका महिलेला व्हिडीओ बघा.

सध्या जगभरासह भारतात सुद्धा कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांचे जीव जायला सुरूवात झाली आहे. अशात  कोरोनाच्या जाळ्यातून बाहेर येत असलेले लोक चर्चेचा विषय ठरले आहेत. आज आम्ही तुम्हाला कोरोना व्हायरसच्या जाळ्यातून सुखरूप सुटका झालेल्या एका महिलेचा व्हिडीओ दाखवणार आहोत. 

सर्दी, ताप, खोकला कोरोना व्हायरसची इतकीच लक्षणं नाहीत. कोरोनाव्हायरस झाल्यानंतर नेमकं काय होतं, हा अनुभव एका कोरोनाग्रस्त ट्विटर युजरने (Twitter User) सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. २२ वर्षीय बिजोंडा हलीतीला (Bjonda Haliti) कोरोना व्हायरस आहे.

कोरोना व्हायरसबाबत लोकांना माहिती व्हावी आणि त्याबाबत लोकांच्या मनातील गैरसमज राहू नयेत, यासाठी तिनं ट्विटवर आपला अनुभव केला शेअरआहे आणि लोकांच्या मनातील भीतीही दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.  सुरुवातील बजोंडाला कोरडा खोकला होता, घशात थोडीशी खवखव वाटत होती. शिवाय थकवाही होता. नंतर डोकं जड झालं, सोबतच थंडी आणि तापही होता. सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे डोळ्यांमध्ये वेदना आणि तोंडात कडवट चव होती. 

तिसरा संपूर्ण दिवस बजोंडाने झोपून काढला कारण तिची शारीरिक शक्ती कमी झाली होती आणि ताप खूप वाढला होचा. सोबतच कोरडा खोकला, तीव्र डोकेदुखी, थंडी लागण आणि भीतीही वाटत होती. नंतर  बजोंडा डॉक्टरकडे गेली. त्यावेळी तिला फ्लू  किंवा स्ट्रेप असं काही नसल्याचं सांगितलं आणि अँटिबायोटिक्स घेण्याचा सल्ला दिला.

चार दिवसांनी बजोंडाचा ताप पूर्णपणे गेला, मात्र इतर लक्षणं दिसून आली. श्वास घेण्यात समस्या जाणवू लागली. बजोंडा म्हणाली, "मला माझ्या छातीवर एक मोठा दगड ठेवल्यासारखं वाटत होतं.शेवटी कोरोनाव्हायरस टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी स्वतला बंदिस्तही करून घेतलं आणि रिपोर्टची प्रतीक्षा केली आणि कोरोनाव्हायरस असल्याचं समजलं.  ( हे पण वाचा- Corona virus : उन्हात बसून कोरोनापासून लांब राहता येतं? जाणून घ्या एक्सपर्ट्सचं मत)

शिवाय एका विशिष्ट गटाला कोरोनाव्हायरसचा धोका आहे, असं सांगितलं जातं. मात्र 22 वर्षांच्या बीजोंडाने आपल्याला दुसरा कोणताही आजार नाही, तसंच आपण धूम्रपान करत नसल्याचंही तिनं स्पष्ट केलं. बीजोंडावर उपचार सुरू असून, तिची तब्येत बरी होत आहे. सगळ्यांना काळजी घेण्याचं आवाहन बोजांडाने केलं आहे. ( हे पण वाचा-Coronavirus : कोरोनामुळे बळावला हात धुण्याचा आजार, मानसिक रुग्णांच्या चिंतेत वाढ)

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलcorona virusकोरोना वायरस बातम्या