शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बॅंकेच्या एका चुकीमुळे महाविद्यालयीन मुलगी झाली करोडपती, वर्षभरात उडवले 18 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 13:20 IST

बॅंकेच्या एका चुकीमुळे महाविद्यालयीन मुलगी झाली करोडपती झाली आहे.

नवी दिल्ली : हे सोशल मीडियाचे युग आहे इथे कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. नेहमी काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. कधी एका रात्रीत दिवाळखोरीला आलेली माणसे समोर येतात तर काहींचे नशीब अचानक चमकते आणि धन-संपत्तीने मालामाल होतात. सध्या अशाच एका तरूणीची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. या तरूणीला बॅंकेच्या एका चुकीमुळे तब्बल 18 कोटींची जणू काय लॉटरीच लागली. कारण बॅंकेने केलेल्या एका चुकीमुळे ही महाविद्यालयीन तरूणी रातोरात मालामाल झाली.

दरम्यान, क्रिस्टीन जियाक्सिन (Christine Jiaxin) नावाची विद्यार्थिनी वेस्टपॅक ( Westpac) बँकेच्या चुकीमुळे वर्षभर राजेशाही जीवन जगली. तिने 11 महिन्यांत केवळ महागड्या बॅग, कपडे आणि अपार्टमेंटवर करोडो रुपये खर्च केले. महाविद्यालयीन तरूणीचा हा प्रताप सर्वांचे लक्ष वेधत आहे, कारण काही दिवसांतच या तरूणीचे आयुष्य बदलून गेले होते.

खात्यात आले तब्बल 24 कोटी रूपयेक्रिस्टीन जियाक्सिन ही मेकॅनिकल इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी असून ती सिडनीमध्ये शिक्षण घेत आहे. वेस्टपॅक बँकेने 2 वर्षांपूर्वी केलेल्या एका चुकीमुळे तिच्या खात्यात £2.6 मिलियन म्हणजेच 24 कोटी रूपयांहून अधिक रक्कम जमा झाली. जेव्हा 21 वर्षीय क्रिस्टीन जियाक्सिनने ही रक्कम पाहिली तेव्हापासून तिने तिच्या राहणीमानात बदल करण्यास सुरूवात केली. लक्षणीय बाब म्हणजे 11 महिन्यांत या  मुलीने भरपूर पैसे खर्च केले. दागिने आणि कपड्यांपासून ते परिसरातील एका महागड्या पेंटहाऊसमध्ये घर बांधण्यापर्यंत सर्व गोष्टींवर तिने ही रक्कम उडवली. 

पैसे घेऊन तरूणी झाली होती फरारआपल्या खात्यात कोट्यवधी रूपयांची रक्कम असल्यामुळे तरूणीने राजेशाही जीवन जगण्यास सुरूवात केली. तिने जवळपास £2,500 म्हणजेच 2.3 लाख रूपये सीक्रेट अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले. मलेशियामध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीच्या प्रियकराने आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचा दावा केला आहे, प्रकरण उघडकीस येताच क्रिस्टीन फरार झाली होती. बॅंकेतील अधिकाऱ्यांनी सर्व बाबींच्या माध्यमातून सुमारे 10 कोटी रुपये जमा केले, मात्र उर्वरित रक्कम त्यांना अद्याप मिळाली नाही. मात्र अटकेनंतर क्रिस्टीनने सांगितले की, तिला वाटले की तिच्या पालकांनी तिच्या खात्यात इतके पैसे ट्रान्सफर केले आहेत.

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीMalaysiaमलेशियाbankबँक