शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:47 IST

Christmas Santa Gift Viral Video: ऑफिसमधल्या सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला नेमके काय गिफ्ट केले, ज्याची सोशल मीडियावर चर्चा होतेय.

ख्रिसमस म्हटले की उत्साह, आनंद आणि एकमेकांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू असे समीकरणच असते. सध्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सीक्रेट सांताची मोठी क्रेझ पाहायला मिळते. सहसा या खेळात लोक एकमेकांना चॉकलेट्स, परफ्यूम किंवा शो-पीस भेट देतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका अशा सीक्रेट सांताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने दिलेल्या गिफ्टची चर्चा आता सर्वत्र होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक कर्मचारी त्याला मिळालेले गिफ्ट सर्वांसमोर उघडताना दिसत आहे. सुरुवातीला एक मोठा बॉक्स दिसतो, जो उघडल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच हसू आवरत नाही. या सीक्रेट सांताने कोणत्याही महागड्या वस्तूऐवजी एका मोठ्या बॉक्समध्ये कोबी, फ्लॉवर, गाजर आणि इतर भाज्या भरून भेट म्हणून दिल्या आहेत.

व्हिडीओ तुफान व्हायरल

हा व्हिडिओ 'तनुश्री' नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. भाज्यांची ही अनोखी भेट पाहून ऑफिसमधील इतर कर्मचारीही पोट धरून हसताना दिसत आहेत. आतापर्यंतची ही सर्वात उपयुक्त भेट आहे, असे या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून तो मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने गमतीने लिहिले की, "वाढत्या महागाईच्या काळात यापेक्षा सर्वोत्तम आणि मौल्यवान भेट दुसरी कोणतीच असू शकत नाही."दुसऱ्याने लिहिले की, "प्रत्येकजण भाज्या खातो, त्यामुळे हे गिफ्ट वाया जाणार नाही, खूपच उपयुक्त!" तर तिसऱ्याने म्हटले आहे की, "पुढच्या वेळी मलाही असाच सांता हवा आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Secret Santa's vegetable gift delights employee, sparking viral reaction.

Web Summary : A Secret Santa's unique gift of vegetables, instead of typical presents, has gone viral. The recipient's surprise and amusement, along with witty reactions from colleagues and online users, fueled the video's popularity.
टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरलChristmasनाताळInstagramइन्स्टाग्राम