VIDEO : महिलेला बघून चिम्पांजीने लगेच सुरू केली एक्सरसाइज, मग झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 04:18 PM2021-01-09T16:18:01+5:302021-01-09T16:19:56+5:30

एका प्राणी संग्रहालयातील हा व्हिडीओ असून इंटरेस्टींग आहे. येथील केअर टेकर चिम्पांजीसोबत मस्ती करत आहे. दरम्यान त्याला एक्सरसाइजही शिकवत आहे.

Chimpanzee started doing exercise as he saw the man see viral video | VIDEO : महिलेला बघून चिम्पांजीने लगेच सुरू केली एक्सरसाइज, मग झालं असं काही...

VIDEO : महिलेला बघून चिम्पांजीने लगेच सुरू केली एक्सरसाइज, मग झालं असं काही...

googlenewsNext

सोशल मीडियावर आपण नेहमीच थक्क करून सोडणारे व्हिडीओ बघत असतो. असाच वेगळा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. हा व्हिडीओ एका चिम्पांजीचा आहे. तो यात एका मनुष्याप्रमाणे एक्सरसाइज करताना दिसत आहे. आपणा सर्वांनाच माहीत आहे की, चिम्पांजी हे मनुष्यांच्या हरकती लवकर कॉपी करू लागतात. तेच या व्हिडीओत बघायला मिळतं. एका प्राणी संग्रहालयातील हा व्हिडीओ असून इंटरेस्टींग आहे. येथील केअर टेकर चिम्पांजीसोबत मस्ती करत आहे. दरम्यान त्याला एक्सरसाइजही शिकवत आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यावर हे स्पष्टपणे दिसतं की, चिम्पांजी एक्सरसाइज करण्यात पूर्णपणे परफेक्ट झाला आहे. व्हिडीओ बघू शकता की, चिम्पांजी आणि केअर टेकरच्या मधे एक काचेची भींत आहे. दोघेही इशाऱ्यात बोलताना एक्सरसाइज करू लागतात. हा व्हिडीओ भारतीय वन सेवा अधिकारी सुशांता नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनला लिहिले की, 'कमाल आहे. काय जनावरांना आपल्या मनोरंजनासाठी पिंजऱ्यात राहण्याची गरज आहे? प्राण्यांनी जंगलातच रहावं'.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. कारण एक इतका मोठा चिम्पांजी लहान मुलांसारखा मस्ती करताना दिसत आहे. सामान्यपणे चिम्पांजीचा आकार, त्याचं रूप पाहून लोक घाबरतात. पण यातील चिम्पांजी लोकांची मने जिंकत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १७ हजार वेळा पाहिलं गेलंय. लोक यावर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. 
 

Web Title: Chimpanzee started doing exercise as he saw the man see viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.