Ahmedabad Woman Tries to Rob:गुजरातमधील अहमदाबाद येथील चोरीच्या प्रयत्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका महिलेने ज्वेलरी शॉप लुटण्याचा प्रयत्न केला, पण दुकानदाराच्या हिंमतीमुळे आणि तत्परतेमुळे तिची ही योजना काही सेकंदांतच पूर्णपणे फसली. ही महिला ग्राहक बनून दुकानात आली होती. तिने दागिने पाहण्याच्या बहाण्याने दुकानदाराचे लक्ष विचलित केले आणि अचानक त्याच्यावर मिरची पूड फेकली. मिरची पूड फेकून चोरी करण्याची घटना सीसीटीव्हीमध्ये पूर्णपणे रेकॉर्ड झाली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ही घटना ३ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास अहमदाबादच्या राणीप भाजी मंडईतील एका ज्वेलरी शॉपमध्ये घडली. ही महिला गिऱ्हाईक बनून दुकानात शिरली होती. दागिने पाहण्याच्या बहाण्याने तिने दुकानदाराला बोलण्यात गुंतवून ठेवलं. दुकानदार दागिने दाखवण्यामध्ये व्यस्त असतानाच, महिलेने अचानक आपल्या पर्समधून मिरची पूड काढून दुकानदाराच्या दिशेने फेकली. मिरची पूड फेकल्यामुळे दुकानदार गोंधळून जाईल आणि या संधीचा फायदा घेऊन दागिने घेऊन पळून जाता येईल, अशी तिची योजना होती.
मिरची पूड फेकल्यामुळे दुकानदार थोडासा गाफील झाला, पण त्याने लगेचच तत्परता दाखवत पलटवार केला. महिला तिच्या लुटीच्या प्रयत्नात यशस्वी होण्यापूर्वीच, दुकानदार तिच्यावर तुटून पडला. दुकानदाराने केवळ २० सेकंदांच्या आत महिलेला १७ हून अधिक जोरदार कानाखाली मारल्या. दुकानदाराच्या या प्रतिकारामुळे महिला पूर्णपणे घाबरली आणि गोंधळून गेली. तिची लुटीची योजना जागच्या जागीच फेल झाली.
व्हिडिओ व्हायरल, पोलिसांचा तपास सुरू
दुकानदाराने महिलेला मारहाण करून दुकानातून बाहेर ढकलले, त्यानंतर ती महिला घटनास्थळावरून पळून गेली. संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि दुकानदाराच्या हिंमतीची चर्चा सर्वत्र सुरू झाली. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर अहमदाबाद पोलिसांनी या लुटमारीचा प्रयत्न करणाऱ्या महिलेची ओळख पटवून तिला शोधण्याचे काम सुरू केले आहे.
Web Summary : In Ahmedabad, a woman's attempt to rob a jewelry store using pepper spray failed. The alert shopkeeper fought back, slapping her multiple times and thwarting the robbery. Police are investigating the incident captured on CCTV.
Web Summary : अहमदाबाद में, एक महिला द्वारा मिर्च स्प्रे का उपयोग करके एक गहने की दुकान को लूटने का प्रयास विफल रहा। सतर्क दुकानदार ने जवाबी हमला किया, उसे कई बार थप्पड़ मारे और डकैती को विफल कर दिया। पुलिस सीसीटीवी में कैद घटना की जांच कर रही है।