असं अनेकदा होतं की, एखादी वस्तू आपल्या डोळ्यांसमोरच असते, पण आपण ती बघू शकत नाही. असं अनेकदा काही फोटोंबाबतही होतं. असतं सगळं समोरच पण लोकांना दिसत नाही. एक फोटो समोर आला आहे, या फोटोत लपली आहे एक मांजर. पण ती मांजर लोकांना काही केल्या दिसत नाहीये. बरेचजण मांजर शोधून थकले, आता तुम्हीही ट्राय करा.
हा फोटो लोक डोळ्यात तेल घालून बारकाईने बघत आहेत. काही लोक म्हणाले की, त्यांना मांजर दिसली. पण काही लोक म्हणाले की, त्यांना मांजर अजिबातच दिसत नाहीये.
तुम्हाला जर वाटत असेल की, तुमचे डोळे फारच तीक्ष्ण आहे. तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही तर लगेच कामाला लागा आणि या व्हायरल झालेल्या फोटोत लपलेली मांजर शोधा.
काही लोकांनी खरंच फार जास्त मेहनत घेत मांजर शोधली आहे.