शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
3
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
4
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
5
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
6
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
7
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
8
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
9
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
10
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
11
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
12
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
13
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
14
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
15
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
16
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
17
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
18
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
19
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
20
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
Daily Top 2Weekly Top 5

कराडच्या विदेशी जावयासाठी वधूचा 'देशी स्टाईल' उखाणा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 19:14 IST

सातारा : लग्न सोहळ्यात वधू - वराकडून उखाणे घेण्याची परंपरा आजही जपली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या एक विवाह ...

सातारा : लग्न सोहळ्यात वधू - वराकडून उखाणे घेण्याची परंपरा आजही जपली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या एक विवाह सोहळ्यातही एका वधूने आपल्या विदेशी पतीसाठी घेतलेला खास आणि खुसखुशीत उखाणा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या उखाण्याने पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड तर दिलीच, शिवाय कराडच्या जावयाला ‘सातारी ठसका’ही दाखवून दिला.हा लग्न सोहळा नेमका कुठे व कधी पार पडला? याचा उल्लेख व्हायरल व्हिडिओत नाही, मात्र कराडच्या जावयासाठी उखाणा घेत असल्याचे कॅप्शन मात्र देण्यात आले आहे. व्हिडिओतील त्या जावयाचे नाव ‘टॅरन’ असून, या ‘विदेशी’ नवऱ्याला वधूने ‘देशी’ उखाण्यात गुंफले. वधूच्या या अनोख्या सादरीकरणाने हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. या उखाण्याला वऱ्हाडी मंडळींनी भरभरून दाद दिली. वधूची विनोदी अंदाजात उखाणा घेण्याची पद्धत कॅमेऱ्यात कैद झाली आणि पाहता-पाहता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

वधूने सादर केलेला उखाणा असा..‘उखाणा म्हणजे काय, That I knowभारतात आला हा, Even my mom said noइथे येऊन याने, जिंकले सर्वांचे मनकराडचे बनले जावई, माझे पती परमेश्वर टॅरन !’

कमेंटचा पाऊस...उखाण्याचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मनोरंजनाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. नेटकऱ्यांनी या जोडप्याला शुभेच्छा देत आणि वधूच्या अनोख्या उखाण्याचं कौतुक करत कमेंट्सचा पाऊस पाडला. कराडच्या जावयासाठी घेतलेला हा उखाणा सोशल मीडियावर हिट झाला असून, उखाण्याची ही पद्धत अनेकांच्या पसंतीसही उतरली.

English
हिंदी सारांश
Web Title : Bride's 'Desi Style' Ukhane for Foreign Groom from Karad!

Web Summary : A bride's unique 'ukhane' (Marathi verse) for her foreign husband from Karad went viral. The bride blended tradition with modernity, impressing everyone with her wit and humor at the wedding. The video captured the special moment, sparking positive reactions online.