Bride is left in shock after her groom's ex-girlfriend crashes their wedding wearing a bridal go | Video : एक्सच्या लग्नात पोहोचली ती; अन...
Video : एक्सच्या लग्नात पोहोचली ती; अन...

वेगवेगळ्या लग्नांमधील वेगवेगळे विचित्र किस्से तुम्ही ऐकले पाहिले असतील. इतकंच काय तर अनेक सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, लग्नाच्या शेवटच्या टप्प्यात नवरदेवाची एक्स येते आणि 'नहीं ये शादी नहीं होत सकती. ये मेरे बच्चे का बाप बनने वाला हैं' वगैरे वगैरे. 
खऱ्या आयुष्यातही असाच काहीसा किस्सा समोर आला आहे. चीनमध्ये एका लग्नात नवरदेवाची एक्स अचानक आली आणि ती त्याला हे लग्न नको करु, माझी चूक झाली, मला माफ करा, अशी विनंती करु लागली. 

या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. यात ती तरुणी नवरदेवाला म्हणते की, 'माझी चूक झाली'. अचानक घडलेला हा सगळा प्रकार पाहून नवरीला चांगलाच धक्का बसला. हा सगळा प्रकार तेव्हा घडला जेव्हा नवरदेव प्रथेप्रमाणे नवरीला किस किरणार होता. पण हे सगळं घडल्यावर नवरी स्टेज सोडून निघून गेली. 

हा ३० सेकंदाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आधी एका एन्टरटेन्मेंट ब्लॉगरने शेअर केला होता. त्यानंतर अनेकांनी शेअर केला. 

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, नवरदेवाने त्या तरूणीसोबत ब्रेकअप केलं होतं. कारण दोघांचेही विचार वेगळे होते. पण तिला लग्नात असं अचानकपणे तेही नवरीच्या ड्रेसमध्ये पाहून नवरदेवही हैराण झाला होता. 


Web Title: Bride is left in shock after her groom's ex-girlfriend crashes their wedding wearing a bridal go
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.