शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार! ऑफिससाठी 1 मिनिटही उशीर झाला तर मिळणार कठोर शिक्षा; बॉसचं अजब फर्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 13:27 IST

एका ऑफिसच्या अतिशय विचित्र नियमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. ज्यामध्ये एका बॉसने कर्मचार्‍यांना 1 मिनिटही उशीर झाला तरी कडक शिक्षेची घोषणा केली आहे.

ऑफिसमध्ये वेळेवर येणं हा नियमही असतो आणि प्रोफेशनलिज्मचा भागही असतो. परंतु अनेकदा ट्रेन, बस किंवा इतर काही वैयक्तिक कारणांमुळे असे प्रसंग येतात की कर्मचाऱ्यांना ऑफिसला यायला 5 ते 10 मिनिटं उशीर होतो. बर्‍याच ठिकाणी कर्मचार्‍यांना 15 मिनिटांपर्यंत उशिरा येण्याची परवानगीही दिली जाते. परंतु सध्या एका ऑफिसच्या अतिशय विचित्र नियमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. ज्यामध्ये एका बॉसने कर्मचार्‍यांना 1 मिनिटही उशीर झाला तरी कडक शिक्षेची घोषणा केली आहे.

डेली स्टार वेबसाईटच्या रिपोर्टमध्ये सोशल मीडिया साइट Reddit वर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टचा उल्लेख आहे. या पोस्टबद्दल सांगण्यापूर्वी, ही एक व्हायरल पोस्ट आहे हे स्पष्ट करणं आवश्यक आहे, त्यामुळे ही पोस्ट खरी असल्याचा दावा करत नाही. Reddit वर, एका युजरने त्याच्या ऑफिसमध्ये बॉसने जारी केलेल्या एका नियमाबद्दल सर्वांना सांगितलं, जे समजल्यावर लोक हैराण झाले आहेत. 

व्यक्तीने ऑफिसमध्ये लावण्यात आलेली एक नोटीस शेअर केली आहे. यावर लिहिलं आहे - "आजपर्यंत मी जिथे जिथे काम केलं, त्यातील ही सर्वात वाईट जागा आहे. सॅलरीही कमी आहे." या नोटीसमध्ये लिहिलं आहे की जर तुम्हाला ऑफिसमध्ये यायला 1 मिनिटही उशीर झाला, तर तुम्हाला संध्याकाळी 6 नंतर 10 मिनिटं जास्त काम करावं लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही 10 वाजून 2 मिनिटांनी ऑफिसमध्ये आला तर तुम्ही 6 वाजून 20 मिनिटांनीच ऑफिसमधून बाहेर पडू शकता.

पोस्टवर 70 हजारांहून अधिक लाईक्स आले असून हजारो लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीने म्हटलं की हा अतिशय मूर्ख आणि बेकायदेशीर नियम आहे. आणखी एकाने विचारलं की बॉसला त्याचे कर्मचारी गमावायचे आहेत का, कारण कर्मचारी गमावण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. एकाने विचारलं की जर कोणी सकाळी 9 वाजून 58 मिनिटांनी कार्यालयात प्रवेश केला तर त्याला 5 वाजून 40 मिनिटांनी ऑफिसमधून निघण्याची परवानगी दिली जाणार का? एकाने तर यावर अतिशय अनोखी कल्पना मांडली. त्याने म्हटलं की कर्मचाऱ्याने एक तास उशिरा यायला हवं. यानंतर नियमानुसार जास्त काम करून ओव्हरटाईमचा दावा करत कंपनीकडून पैसे घ्यायला हवे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके