शहरं
Join us  
Trending Stories
1
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
2
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
3
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
4
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
5
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
6
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
7
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
8
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
9
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
10
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
11
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
12
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
13
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
14
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
15
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
16
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
17
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
18
Exclusive: ठाकरेंच्या युतीमुळे भाजपा बॅकफूटवर? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
19
मशीद पाडल्याची खोटी अफवा, मनपा कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक; दिल्लीत ११ जणांना अटक!
20
Dipu Chandra Das Case: आधी निर्घृण हत्या, नंतर झाडाला टांगून जाळलं; दीपू चंद्र दास हत्याकांडातील मुख्य आरोपी अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 17:51 IST

काही ऑफिसमधील कल्चर इतकं टॉक्सिक आहे की, त्यांनी कर्मचाऱ्याला पत्नीच्या डिलिव्हरीच्या वेळीही काम करायला सांगितलं आहे.

आई-बाबा होणं हा कपलसाठी आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असतो. अशा वेळी एखाद्या व्यक्तीने ऑफिसपेक्षा आपली पत्नी आणि कुटुंबाला प्राधान्य दिलं पाहिजे. पण काही ऑफिसमधील कल्चर इतकं टॉक्सिक आहे की, त्यांनी कर्मचाऱ्याला पत्नीच्या डिलिव्हरीच्या वेळीही काम करायला सांगितलं. रेडीटवर एका युजरने आपल्या बॉससोबतच चॅट शेअर केलं आहे.

"माझ्या पत्नीला डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मी माझ्या मॅनेजरला सांगितलं आणि फक्त दोन दिवसांची सुटी मागितली. साधी सहानुभूती दाखवण्याऐवजी, बॉसने मला माझी सुटी पुढे ढकलण्यास सांगितली आणि "तुझे मम्मी-पप्पा हे मॅनेज करू शकतात का?" असा प्रश्न विचारला. मला रुग्णालयातून काम करण्यास सांगितलं."

"संभाषणादरम्यान, मला पूर्णपणे असहाय्य वाटलं. ज्या वेळी मी माझ्या पत्नीवर आणि माझ्या नवजात बाळावर लक्ष केंद्रित करायला हवं होतं तेव्हा मी लॅपटॉप घेऊन हॉस्पिटलच्या खोलीत का बसू शकत नाही हे समजावून सांगण्यात व्यस्त होतो." कर्मचारी पुढे म्हणतो, "सर्वात वाईट गोष्ट म्हणजे मी हे काम सोडू शकत नाही. मला एक मूल आहे आणि माझ्या जबाबदाऱ्या वाढत आहेत.

"माझ्या कंपनीतील परिस्थिती अशी आहे की जर मी जास्त काही बोललो तर मला कामावरून काढून टाकलं जाण्याची भीती वाटते. मला माहित नाही की भारतीय मॅनेजर अजूनही असं का मानतात की कर्मचाऱ्यांनी पर्सनल आयुष्य जगू नये, अगदी मुलाच्या जन्मासारख्या मोठ्या घटनेच्या वेळीही. मला फक्त माझं मत व्यक्त करायचं होतं. इतर कोणालाही असेच काही अनुभव आले आहे का?" या पोस्टवर आता लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Inhuman! Boss Demands 'Work From Hospital' During Wife's Delivery Leave.

Web Summary : A Reddit user shared a shocking experience where their boss denied paternity leave and suggested 'work from hospital' during his wife's delivery. The employee felt helpless, fearing job loss if he protested, highlighting a toxic work culture prioritizing work over family.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल