Black Demon Fish Video: समुद्राच्या तळाशी अनेक गूढ प्राण्यांचे वास्तव्य आहे. हे प्राणी क्वचितच पाहायला मिळतात. हे इतके भयंकर आहेत की, तुम्ही पाहून घाबरुन जाल. कधीकधी हे प्राणी समुद्राच्या पृष्टभागावर पाहायला मिळतात. यांचे अनेक व्हिडिोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता अशाच प्रकारचा एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यात ‘ब्लॅक सी मॉन्स्टर’ किंवा ‘ब्लॅक सीडेव्हिल फिश’ या नावाने ओळखला जाणारा हंपबॅक अँग्लरफिश दिसतोय.
हा 'ब्लॅक सी मॉन्स्टर' स्पेनच्या टेनेरिफच्या किनाऱ्यावर दिसला. सागरी छायाचित्रकार डेव्हिड जारा बोगुना यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या माशाचा एक अप्रतिम व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी हा शोध आश्चर्यकारक असल्याचे सांगत हा मासा जिवंत पाहण्याचे सौभाग्य फार कमी लोकांना मिळते, असे सांगितले. व्हिडिओमध्ये एक गडद तपकिरी मासा तोंड उघडून पोहत असल्याचे दिसते. क्लिपमध्ये या माशाचे भयानक दातही पाहिले जाऊ शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार, बोगुना आणि कॉन्ड्रिक-टेनेरिफ एनजीओच्या संशोधकांनी काही दिवसांपूर्वी या काळ्या राक्षसाचा व्हिडिओ बनवला होता. शार्कवरील संशोधनासाठी ते गेले असताना त्यांना हा मासा टेनेरिफच्या किनाऱ्यापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर पोहताना पाहिला.
या अनोख्या माशाबद्दललल...हंपबॅक अँगलर फिश समुद्रात 200 ते 2000 मीटर खोलीवर राहतो. इथे क्वचितच सूर्यप्रकाश पडतो. अशा परिस्थितीत समुद्रकिनाऱ्याच्या अगदी जवळ हा मासा दिसने शास्त्रज्ञांना आश्चर्यचकित केले आहे.