शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

बिहारमध्ये शिक्षण विभागाचं पितळ उघडं;शिक्षिकेने झोपडीतून सांभाळला कार्यभार,Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 17:27 IST

शिक्षकांची ही अवस्था तर सुविधांसाठी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळणे दूरचीच बाब.

Viral Video: सध्या सोशल मीडीयावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.  नुकतेच स्त्री शिक्षणाच्या मुद्द्यावरून  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार वादात सापडले होते.त्यांच्याच बिहारमध्ये शिक्षण व्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.तसेच या व्हिडिओमध्ये बिहारमधील शिक्षण व्यवस्थेची दशा स्पष्ट होताना दिसत आहे. सध्याच्या घडीला बिहारमध्ये  पहिल्या टप्प्यातील पात्र उमेदवारांची शिक्षक भरती वेगाने सुरू आहे.या भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या देखील वेगाने करण्यात येत आहेत. अशातच संसेदत शिक्षण व्यवस्थेचे महत्व अधोरेखित करणाऱ्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राज्यातील शिक्षण विभागाचे पितळ उघडे पडले आहे.

शिक्षक भरती प्रक्रियेदरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमुळे सर्वसामान्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. बिहार लोक सेवा आयोग  (बीपीएससी) यांनी टीआरई-१ नूसार केलेल्या भरती प्रक्रियेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याच दरम्यान एका नवनियुक्त शिक्षिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका एका झोपडीमध्ये जमीनीवर बसून रजिस्टरमध्ये नोंदी करताना दिसत आहे.  

एकीकडे सरकार डिजीटल इंडियाच्या घोषणा करत असताना देशात मात्र शिक्षणव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्य़ाचे पाहायला मिळत आहे.बिहारमधील शिक्षण यंत्रणेची दशा सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.पत्रकार उत्कर्ष सिंह यांनी बिहारमधील शिक्षण विभागाचे पितळ उघडे पाडले आहे.बिहारमधील ही शिक्षण व्यवस्थेची सत्यस्थिती त्यांनी सोशल मीडियावर मांडली आहे.हा व्हिडीओ आतापर्यंत तब्बल ४ लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे,तर ५ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ शेअर देखील केला आहे. त्यातील काही जणांनी उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा अशीच स्थिती आहे,अशी सूचक कमेंट केली आहे.तर काहींनी कमेंट्सच्या माध्यमातून राजकारण्यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. झोपडीत भरलेल्या या शाळेचा व्हिडिओ बिहारच्या चंपारण जिल्ह्यातील प्राथमिक शाळेचा आहे. उत्कर्ष सिंह यांच्या म्हणण्यानूसार अजूनही बिहारमध्ये तब्बल ५,४१९ ठिकाणी  पक्क्या सरकारी शाळा नाहीत.

शिक्षक भरती प्रक्रियेत १.२ लाख उमेदवारांची वर्णी - साधारणत:  २६ ऑेक्टोबर २०२३ दरम्यान बिहार लोकसेवा आयोगाने शिक्षक भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली.आतापर्यंत किमान ९० टक्के उमेदवारांच्या नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले असून त्यातील काही शिक्षक आपल्या पदावर रुजू झाले आहेत. बीपीएस द्वारे राज्यातील प्राथिमिक,उच्च प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांकरिता १.७० लाख शिक्षकांच्य़ा पदांसाठी जाहिरात करण्यात आली. या भरती प्रक्रियेत १.२० लाख उमेदवारांची वर्णी लागली आहे.

आतापर्यंत १.२२ लाख पदांसाठी अर्ज - बिहारमधील  प्राथमिक,उच्च प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मुदतवाढ देण्यात आली आहे.बीएससीचे चेअरमन अतुल प्रसाद यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.याआधी  शिक्षक भरतीसाठी ५ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यात काहीसा बदल करण्यात आला, शिक्षक भरतीसाठी उमेदवारांना आता २५  नोव्हेंबर पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.

 

येथे पाहा व्हिडिओ:

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर