शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

दिराला पाहताच बेभान झाली वहिनी, नाचायला लागली...नवरीला स्टेजवर आणलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 15:20 IST

सोशल मीडीयावर (Social Media) सध्या लग्नासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतोय. या व्हिडीओत दिराच्या लग्नात त्याची मोठी वहिनी खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडला आहे.

पावसाळा संपला. आता तुळशीचं देखील लग्न लागलं. त्यामुळे लवकरच लगीन सराईत सुरु होईल. कोरोना संकटामुळे (Corona Pandemic) अनेक तरुण-तरुणींचे लग्न (Marriage) पुढे ढकलण्यात आले. काही तरुणांची लग्न झाली. पण काहींनी कोरोना संकट संपवल्यावर लग्न करण्याचं ठरवलं. आता कोरोनाचं संक्रमण देखील कमी झालंय. त्यामुळे अनेकांचं लवकरच धुमधडाक्यात लग्न लागण्याची शक्यता आहे. असं असताना सोशल मीडीयावर (Social Media) सध्या लग्नासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतोय. या व्हिडीओत दिराच्या लग्नात त्याची मोठी वहिनी खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडला आहे.

संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओतील महिला 'हम आपके है कोण' या हिंदी चित्रपटातील 'लो चली मै अपनी देवर की बारात लेके' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत महिलेचा दीर देखील आपल्या वहिनीसोबत थिरकताना दिसतोय. तसंच तो आपल्या वहिनीला नमस्कार देखील करताना दिसतोय.

दिराचं लग्न असलं की वहिनीचा मोठा थाट असतो ही गोष्टी काही सांगायची गरज नाही. कारण ते नातंच तसं असतं. या नात्यात मैत्री, प्रेम आणि आदर असतो. त्यामुळे दिराचं लग्न म्हटलं की वहिनीच्या मनात देखील एक वेगळा उत्साह असतो. याशिवाय लग्नातील अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये वहिनी मोलाचं योगदान देते. तसेच लग्नात डान्स करण्यातही वहिनी पुढेच असते. अशाच एका वहिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा संबंधित व्हिडीओ हा २ मिनट २६ सेकंदाचा आहे. आशिष मित्तल नावाच्या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ कालच (16 नोव्हेंबर) शेअर करण्यात आलाय आणि आतापर्यंत २ लाख ८० हजारापेक्षाही जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला देखील आहे.

विशेष म्हणजे या व्हिडीओत नंतर नवरीला देखील आणलं जातं. त्यानंतर नवरीदेखील या व्हिडीओत थिरकताना दिसते. यावेळी 'वाह वाह रामजी, जोडी क्या बनाई', असं गाणं लावण्यात येतं. हा सर्व आनंदाचा क्षण घरातील इतर सदस्य खूप आनंदाने बघत असतात. घरातील काही वरिष्ठ सदस्य यावेळी पाचशेच्या नोटा नवरदेव-नवरीला ओवळत हवेत उडवतात.

हा व्हिडीओ बघून अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने म्हटलं की, "मी या व्हिडीओला चारवेळा सारखं पाहिलं. तरीही माझी हा व्हिडीओ वारंवार पाहण्याची इच्छा होते. वहिनी तुम्ही खूप गोड आहात. परमेश्वर आपल्याला खूप आनंद देवो." तर दुसऱ्या एका युजरने "हा व्हिडीओ सर्वात भारी व्हिडीओ आहे", अशी प्रतिक्रिया दिलीय.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाmarriageलग्नYouTubeयु ट्यूब