शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

Beirut Blast: ड्युटी फर्स्ट! स्फोटांनी समोरच्या काचा फुटल्या; पण 'ती' नर्स तीन बाळांना घेऊन कामात व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 5:09 PM

Beirut Blast: कठीण परिस्थितीतही नर्सनं न डगमगता तिचं कर्तव्य बजावलं; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

बैरूत: लेबनॉनची राजधानी बैरुत काल दोन भीषण स्फोटांनी हादरली. यामध्ये १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ४ हजार जण जखमी झाले आहेत. जखमींचा आकडा पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बैरुतमध्ये झालेल्या स्फोटांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमधून स्फोटांची तीव्रता लक्षात येते. आसपासच्या १० किलोमीटरपर्यंत स्फोटाचे आवाज ऐकू गेले. आसपास असलेल्या कित्येक किलोमीटरील घरांच्या काचा फुटल्या. छतांचं मोठं नुकसान झालं. एका बाजूला बैरूतमधील स्फोटांची भीषणता दाखवणारे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असताना दुसरीकडे या धडकी भरवणाऱ्या क्षणीदेखील काही जण अतिशय धीरादात्तपणे उभे राहिले. बैरूतमधल्या एका रुग्णालयातल्या नर्सचा असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या नर्सचं सर्वत्र कौतुक सुरू आहे. संकटाच्या काळातही न डमगमता काम करणाऱ्या या नर्सची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. बैरुत स्फोटांमधील सर्वात शक्तीशाली फोटो असं या फोटोचं वर्णन करण्यात आलं आहे. दोन जबरदस्त स्फोट झाल्यानं बैरुतमधील बहुतांश इमारतींच्या काचा फुटल्या. अवघ्या काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं. मात्र या परिस्थितीतही एक नर्स तिच्या कामापासून जराही विचलित झाली नाही. आजूबाजूला काचांचा खच पडला असताना, रुग्णालयाचं खूप नुकसान झालं असतानाही नर्स अतिशय शांतपणे तिचं काम करत होती. त्या नर्सच्या हातांमध्ये तीन तान्ही बालकं होती. तिनं खांद्याचा आधार घेऊन लँडलाईन फोन धरला होता. त्यावरून ती समोरच्या व्यक्तीशी संवाद साधत होती. संकट काळातही आपलं काम अत्यंत चोख बजावणाऱ्या या नर्सचा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मंगळवारी बैरुत दोन शक्तिशाली स्फोट झाले. जवळपास १० किलोमीटर अंतरावर स्फोटाचे धक्के जाणवले. स्फोटामुळे कित्येक इमारतींचं नुकसान झालं. अनेकांच्या घराच्या काचा फुटल्या. स्लॅबचे काही भाग कोसळले. त्यामुळे नागरिक जखमी झाले. या नागरिकांना आसपासच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र जखमींची संख्या ४ हजारांहून अधिक असल्यानं शहरातील रुग्णालयं कमी पडली.