शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? 8 पायांच्या पिल्लाला शेळीने दिला जन्म; पाहण्यासाठी लोकांची झुंबड अन् 5 मिनिटांत झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 11:54 IST

Baby goat born with 8 legs and 2 hips : शेळीने आठ पायांच्या पिल्लाला जन्म दिल्याची माहिती गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली होती. यानंतर गावातील अनेकांनी शेळीच्या पिल्लाला पाहण्यासाठी मोंडल यांच्या घरी मोठी गर्दी केली. 

नवी दिल्ली - देशात अनेक अजब-गजब घटना या घडत असतात. अशीच एक घटना आता पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. एका शेळीने तब्बल 8 पाय (8 Legs and 2 hips) असणाऱ्या पिल्लाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. या शेळीच्या पिल्लाचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहेत. फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून काहींनी हा चमत्कार असल्याचं म्हटलं आहे. पिल्लाला पाहण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. गावकऱ्यांसोबतच इतरही लोकांनी या गावात धाव घेत मोठी गर्दी केल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या बनगावातील कमलेघा परिसरात ही अजब घटना घडली आहे. सरस्वती मोंडल या महिलेकडे शेळ्य़ा, गाय यासह अनेक पाळीव प्राणी आहेत. त्याच्याकडील शेळीने दोन पिल्लांना जन्म दिला. त्यातील एक पिल्लू सामान्य होतं. तर दुसऱ्या पिल्लाला आठ पाय होते. शेळीने आठ पायांच्या पिल्लाला जन्म दिल्याची माहिती गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली होती. यानंतर गावातील अनेकांनी शेळीच्या पिल्लाला पाहण्यासाठी मोंडल यांच्या घरी मोठी गर्दी केली. 

सोशल मीडियावर या शेळीच्या आठ पायांच्या पिल्लाचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. मात्र जन्मानंतर काही मिनिटांतच संबंधित शेळीच्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. सरस्वती मोंडल यांना याबाबत विचारलं असता त्यांनी इंडिया टुडेला याबाबत माहिती दिली आहे. "आठ पायांच्या पिल्लाला शेळीने जन्म दिल्याची घटना मी पहिल्यांदाच पाहत आहे. याचं मलाही आश्चर्य वाटत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे आठ पायांच्या पिल्लाचा जन्मानंतर अवघ्या पाचच मिनिटांत मृत्यू झाला आहे. पण शेळीचं दुसरं पिल्लू आणि शेळी दोघंही सुखरुप आहेत" असं मोंडल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालSocial Viralसोशल व्हायरलIndiaभारत