शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! तरुणींची 'ही' एक गोष्ट मिळवण्यासाठी केली ४२ जणांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 12:18 IST

शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी लोक नाना प्रकारचे धोकादायक मार्ग अवलंबत असतात, यामध्ये जादूटोणा अशा काही घातक उपायांचा समावेश असतो.

नवी दिल्ली । 

सध्याचं युग आपण विज्ञानाचं युग असल्याचं म्हणतो पण या युगात देखील अंधश्रद्धा अजूनही ठराविक लोकांच्या मनात एवढी भिनली आहे की त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी लोक नाना प्रकारचे धोकादायक मार्ग अवलंबत असतात, यामध्ये जादूटोणा अशा काही घातक उपायांचा समावेश असतो. इंडोनेशियात राहणाऱ्या एका व्यक्तीनं शारिरीक शक्ती वाढविण्याच्या मोहापायी चक्क ४२ तरुणींची आणि काही महिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

'डेली स्टार'नं दिलेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीनं अंधश्रद्धेपायी अनेक महिलांचा जीव घेतला आहे. विशेष म्हणजे इंडोनेशियातील या व्यक्तीनं तब्बल ४२ जणांची हत्या केली. चौदा वर्षांपूर्वी १० जून २००८ रोजी या व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हा आरोपीनं गुन्हा कबूल करत १९८६ ते १९९७ दरम्यान आपण ४२ मुलींची आणि काही महिलाचीं हत्या केल्याचं म्हटलं होतं. तसंच त्यानं ११ अल्पवयीन मुलींचा देखील जीव घेतला आहे. 

धक्कादायक कारण आलं समोर दरम्यान, या व्यक्तीला तब्बल ७० मुलींची हत्या करायची होती असं त्यानं सांगितलं. या घृणास्पद कृत्यामागे अंधश्रद्धा हे प्रमुख कारण होतं. तरूण मुलींची आणि महिलांची थुंकी प्यायल्यानं सुपर पॉवर मिळते असा व्यक्तीचा समज होता. यासाठीच त्याला ७० महिलांची हत्या करायची होती. तसेच ७० महिलांची थुंकी प्यायल्यानं तो खूप शक्तीशाली होणार अशी त्याची अंधश्रद्धा होती. आरोपीच्या वडिलांच्या भुतानं त्याला असं करायला सांगितल्यांचं त्यानं म्हटलं आहे. आपल्या वडिलांच्या आत्म्याचं म्हणणं ऐकून त्यानं ७० महिलांची हत्या करण्याचं ठरवलं. 

महिलांची थुंकी पिण्यासाठी वडिलांच्या आत्म्याने महिलांची हत्या करण्यास सांगितले नव्हते, मात्र असं करायला अनेक वर्षे लागतील म्हणून व्यक्तीने हा मार्ग अवलंबला. तेव्हापासून त्याने महिलांची हत्या करण्यास सुरूवात केली. जेव्हा आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं तोवर त्यानं ४२ महिलांचा जीव घेतला होता. आरोपी शेळ्या-मेंढ्यांना चरायला घेऊन जाण्याचं काम करत असे. त्याच्या घराच्या जवळील ऊसाच्या शेतात त्यानं अनेक मृतदेह पुरले होते.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलIndonesiaइंडोनेशियाDeathमृत्यूWomenमहिला