Ants Face Close Up Viral Photo: Danger!!! मुंगीच्या चेहऱ्याचा क्लोस-अप फोटो पाहून तुम्हालाही भरेल धडकी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 10:10 PM2022-10-21T22:10:37+5:302022-10-21T22:12:54+5:30

एका मायक्रो-फोटोग्राफी स्पर्धेतील Eugenijus Kavaliauskas च्या फोटोचीच चर्चा

Ants Face Close Up Photo goes viral clicked by Lithuanian photographer Eugenijus Kavaliauskas netizens afraid as it looks horror | Ants Face Close Up Viral Photo: Danger!!! मुंगीच्या चेहऱ्याचा क्लोस-अप फोटो पाहून तुम्हालाही भरेल धडकी

Ants Face Close Up Viral Photo: Danger!!! मुंगीच्या चेहऱ्याचा क्लोस-अप फोटो पाहून तुम्हालाही भरेल धडकी

googlenewsNext

Ants Face Close Up Viral Photo: एक सामान्य माणूस स्वतःच्या डोळ्यांनी किती झूम करून पाहू शकेल, याला नक्कीच मर्यादा आहेत.  आजूबाजूच्या गोष्टी, विशेषत: निसर्गाला थोडं जवळून पाहण्यासाठी कॅमेरा लेन्सची गरज असते ती सूक्ष्म आणि मॅक्रो लेन्सची. या प्रकारच्या फोटोग्राफीला मायक्रोफोटोग्राफी (Microphotography) असे म्हणतात आणि अशा फोटोग्राफी संबंधी अनेक स्पर्धा घेतल्या जातात. अशीच एक स्पर्धा कॅमेरा आणि लेन्स बनवणारी कंपनी निकॉन (Nikon) कडून घेतली होती. त्याला 'स्मॉल वर्ल्ड फोटोमायक्रोग्राफी कॉम्पिटिशन' (Small World Photomicrography Competition) असे नाव देण्यात आले होते. यामध्ये लोकांना छोट्यात छोट्या गोष्टीचे किंवा वस्तूंचे फोटो, विषयांचे फोटो काढावे लागतात. या प्रकारात एका कलाकाराने अभूतपूर्व अशी कलाकृती सादर करून साऱ्यांनाच हैराण केले.

या स्पर्धेत जगभरातील छायाचित्रकारांनी आपला सहभाग नोंदवला होता. आठवडाभरापूर्वी कंपनीने या स्पर्धेतील विजेत्याचे नाव जाहीर केले. ही स्पर्धा ग्रिगोरी टिमिनने (Grigorii Timin) जिंकली. परंतु वन्यजीव छायाचित्रकार युजेनिजस कावालियास्कस (Eugenijus Kavaliauskas) यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. युरोपातील लिथुआनिया देशाच्या या फोटोग्राफरने मुंगीच्या चेहऱ्याचे छायाचित्र काढले. (Ants Face Viral Photo). त्याच्या फोटोचा जो अंतिम फोटो हाती आला, त्या फोटोने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मुंगीच्या चेहऱ्याचा हा फोटो पाहून लोकांना अक्षरश: भूताच्या हॉरर फिल्मची आठवण झाली. हा व्हायरल झालेला फोटो तुम्हीही एकदा पाहाच-

मुंगीच्या चेहऱ्याचा हा व्हायरल फोटो पाहून लोकांना 'गेम ऑफ थ्रोन्स'चा ड्रॅगन आठवला. Eugenijs Kavaliauskas चा हा फोटो टॉप ६० मध्ये समाविष्ट करण्यात आला. यासाठी त्याला बक्षीसही मिळाले. त्याने हा फोटो यावर्षी ऑगस्ट महिन्यात काढला होता. या फोटोमुळे लोक पूर्णपणे घाबरुन गेले. फोटो शेअर करताना काही लोकांनी लिहिले की, आता मुंगी त्यांच्या स्वप्नातही अशीच दिसेल. Eugenijs Kavaliauscus समान मायक्रोलेन्ससह छायाचित्रे घेतात.

Web Title: Ants Face Close Up Photo goes viral clicked by Lithuanian photographer Eugenijus Kavaliauskas netizens afraid as it looks horror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.