कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. अशात सॅनिटायजर आणि मास्कचा वापर प्रत्येकजण करताना दिसून येत आहे. मास्कचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर पडला आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली असताना आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक मस्त व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप लोकांनी पाहिला आहे.
या व्हिडीओत सोप्या पद्धतीने मास्क कसा तयार करायचा याबाबत कृती दाखवली आहे. याचा वापर करून एखादा लहान मुलगा सुद्धा मास्क तयार करून वापरू शकतो.
या व्हिडीओवर आलेल्या कमेंट्स पाहून तुम्ही खळखळून हसाल.