शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Amit Shah in IPL 2022 Final: अमित शाह सपत्निक फायनल पाहायला स्टेडियममध्ये! चाहत्यांना दाखवलं 'व्हिक्ट्री साईन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 22:26 IST

अमित शाह यांच्यासोबत पत्नी सोनल शाह यांचीही हजेरी

Amit Shah in IPL 2022 Final: हंगामाच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी राजस्थान रॉयल्सला १३० धावांवर रोखले. कर्णधार हार्दिक पांड्याने दमदार गोलंदाजी करत संघाला विजयाची चांगली संधी मिळवून दिली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेला अंतिम सामना पाहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही कुटुंबासह हजेरी लावली. राजस्थान रॉयल्सची फलंदाजी सुरू असताना अमित शहा आणि त्यांची पत्नी सोनल शाह हे सामन्याचा आनंद घेत असल्याचे मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आले.

गृहमंत्री अमित शहा यांना मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आले, तेव्हा मैदानात उपस्थित असलेल्या चाहत्यांनी उत्साहाने जल्लोष केला. अमित शहा यांनीही चाहत्यांना व्हिक्टरी साईन दाखवलं. त्यानंतर स्टेडियममध्ये मोदी-मोदी अशा घोषणाही ऐकू आल्या. गृहमंत्री अमित शाह सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत, त्यांनी आदल्या दिवशीही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती. अमित शाह यांचा मुलगा जय शाह हे बीसीसीआयचे सचिव आहेत.

--

दरम्यान, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचे उद्घाटनही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. या स्टेडियमला ​​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले. हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. येथे एका वेळी सुमारे १ लाख ३० हजार प्रेक्षक बसू शकतात. गुजरात टायटन्सचा हा पहिलाच हंगाम असून ते आयपीएल फायनल खेळत आहेत. विशेष म्हणजे गुजरात पहिल्यांदाच आपल्या घरच्या मैदानावर सामना खेळत आहेत. गुजरात टायटन्सने आयपीएलच्या संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी केली. साखळी सामन्याच्या समाप्तीनंतर ते संघ गुणतालिकेत अव्वल होते. त्यामुळे मूळचे गुजरातचे असलेले अमित शाह आपल्या पत्नीसह स्टेडियममध्ये हजर राहिले.

 

टॅग्स :IPLआयपीएल २०२२Amit Shahअमित शाहGujarat Titansगुजरात टायटन्सNarendra Modiनरेंद्र मोदी