शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Video - मजनूची मस्ती उतरवली! ३५ सेकंदात ३७ वेळा चपलेने चोपलं; महिलेने अद्दल घडवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 12:38 IST

छेड काढणाऱ्या तरुणाला चांगलाच धडा शिकवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्ह्यातून छेड काढणाऱ्या तरुणाला चांगलाच धडा शिकवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. बऱ्याच दिवसांपासून त्रास देणाऱ्या तरुणाची एका महिलेने कॉलर धरून पोलीस ठाण्यासमोरच चपलेनी त्याची जोरदार धुलाई केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

गंगीरी पोलीस ठाण्याच्या परिसरातील ही घटना आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ सुमारे ५२ सेकंदांचा असून, त्यात साडी नेसलेली एक महिला प्रचंड संतापलेली दिसत आहे. संबंधित तरुण गेल्या अनेक दिवसांपासून या महिलेची छेड काढून तिला त्रास देत होता आणि तिला बदनाम करण्याची धमकीही देत होता.

जेव्हा महिला आणि तिचा पती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचले, तेव्हा आरोपी तरुण तिथेच उभा असल्याचं त्यांना दिसलं. त्याला पाहताच संतापलेल्या पतीने त्याला रस्त्यावर पाडलं. त्यानंतर जे घडले ते पाहून सर्वच थक्क झाले. महिलेने आपली चप्पल काढली आणि अवघ्या ३५ सेकंदात त्या तरुणाच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि छातीवर ३७ वेळा मारलं. महिला एवढ्यावरच शांत झाला नाही, तर तिने त्याला पायानेही तुडवलं.

धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार पोलीस ठाण्याच्या अगदी समोरच घडत होता. व्हिडिओमध्ये एक पोलीस कर्मचारी बाजूला उभा राहून फोनवर बोलताना दिसत आहे. पोलिसांच्या या भूमिकेवर आता सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे, पोलिसांसमोरच कायदा हातात घेतला जात असताना ते गप्प का बसले असा सवाल विचारला जात आहे. बराच वेळ हा प्रकार चालल्यानंतर एका उपनिरीक्षकाने यात हस्तक्षेप केला आणि तरुणाला महिला व तिच्या पतीच्या तावडीतून सोडवून पोलीस ठाण्यात नेलं.

महिलेचं म्हणणं आहे की, आरोपीच्या वागण्यामुळे ती आणि तिचं कुटुंब मानसिकदृष्ट्या कोलमडून गेलं होतं. तो वारंवार तिचा छळ करत होता. जेव्हा सहनशक्ती संपली, तेव्हा स्वतःच त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतल्याचं तिने सांगितलं. सध्या पोलिसांनी दोन्ही बाजूंने चौकशी सुरू केली आहे. अद्याप पोलिसांकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आले नसलं तरी या घटनेची संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Video: Woman teaches harasser a lesson with 37 shoe strikes!

Web Summary : In Uttar Pradesh, a woman publicly thrashed a harasser with her shoe near a police station after enduring persistent harassment and threats. The incident, captured on video, shows the woman's furious response to the man's actions, prompting a police investigation and raising questions about police inaction.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओ