Air India Flight : गेल्या काही काळापासून विविध विमान कंपन्यांच्या विमानात तांत्रिक बिघाडाच्या घटना वाढल्या आहेत. कधी विमानाची इमरजन्सी लँडिंग केली जाते, तर कधी विमान वेळेवर उड्डाणच घेत नाही. आता अशीच घटना एअर इंडियाच्या विमानात घडली आहे. मुंबईवरुन दुबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा प्रवास दुखद प्नापेक्षा कमी नव्हता. तेजस्वी आनंदकुमार सोनी नावाच्या व्यक्तीने या भीषण अनुभवाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
प्रवासी पाच तास विमानात अडकलेया व्हिडिओमध्ये प्रवाशांची अवस्था आणि विमान कंपनीचा निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून येतोय. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने सांगितले की, विमान सकाळी 8:25 वाजता उड्डाण करणार होते, परंतु खराब एअर कंडिशनिंगमुळे प्रवाशांना 5 तास विमानात बसावे लागले. हे पाच तास प्रवाशांसाठी अतिशय भीषण होते. कारण, विमानात एसी सुरू नव्हता, कोणालाही बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. अशा परिस्थितीत सर्व प्रवाशांना पास तास गरमीत बसावे लागले.
कॅप्टनने प्रतिक्रिया दिली नाहीतेजस्वीने सांगितले की, या फ्लाइटमध्ये लहान मुले आणि वृद्ध प्रवासीदेखील होते. दम गुदमरल्यामुळे त्या सर्वांना खूप अस्वस्थ वाटू लागले. या परिस्थितीत विमानातील कर्मचाऱ्यांनी कुठलीही प्रतिक्रिया किंवा मदत केली नाही. पाच तास प्रतीक्षा करूनही कॅप्टनने प्रवाशांशी एकदाही बोलण्याची तसदी घेतली नाही. जोपर्यंत परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात नाही, तोपर्यंत तो कॉकपिटमध्येच बसून राहिला. संतप्त प्रवाशांनी विमानात आरडाओरड सुरू केली. अखेर दरवाजा उघडल्यानंतरच प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.
अनेकांचा संतापया घटनेनंतर एअर इंडियाच्या निष्काळजीपणाबद्दल लोक सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत. या व्हिडिोच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी त्यांचे वाईट अनुभव शेअर केले आणि एअर इंडियाच्या खराब सेवेवर प्रश्न उपस्थित केले. सध्या या व्हायरल व्हिडिओवर एअर इंडियाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.