शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

टोलेजंग इमारतीवर AC बसवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 17:19 IST

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Trending Video : गेल्या काही काळापासून गरमी वाढत आहे, त्यामुळेच अनेकजण आपल्या घरात AC बसवतात. गरम हवा बाहेर फेकणारे ACचे कॉम्प्रेसर/आऊटडोअर युनिट  घराबाहेर बसवले जाते. शहरांमध्ये टोलेजंग इमारतींवर तुम्ही अनेकदा अशाप्रकारचे AC कॉम्प्रेसर/आऊटडोअर युनिट पाहिले असतील. हे पाहून तुम्हाला कधी प्रश्न पडतो का की, हे इतक्या उंचीवर बसवले कसे जातात? सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल.

व्हिडिओ व्हायरल...सध्या सोशल मीडियावर एका AC टेक्निशियनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो अनेक मजली इमारतीवर AC चे कॉम्प्रेसर/आऊटडोअर युनिट बसवताना दिसतोय. विशेष म्हणजे, यासाठी तो चक्क खिडकीबाहेर दोरीच्या सहाय्याने लटकतो. व्हिडीओतील व्यक्ती अतिशय चतुराईने स्वतःला इमारतीच्या भिंतीवर झोकून देतो आणि AC चे आऊटडोअर युनिट बसवतो. हे दृश्य पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील.

एवढ्या उंचीवर सर्व काही एकट्याने केलेतो टेक्निशियन एकटाच सर्व कामे करताना दिसतोय. त्याचा सहकारी त्याला खिडकीतून एक-एक गोष्टी हातात देतो आणि तो दोरीच्या सहाय्याने ही कामे करतो. ड्रील मशीन चालवणे असेल किंवा कॉम्प्रेसर/आऊटडोअर युनिट उचलून निश्चित ठिकाणी बसवणे असेल, सर्वकाही तो स्वतः करतो. हा व्हिडिओ @HowThingsWork_ नावाच्या X अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत 13.8 मिलियनपेक्षा जास्त व्हू मिळाले आहेत. 

या व्हिडिओवर अनेक सोशल मीडिया यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले...या व्यक्तीला कंपनीच्या सीईओपेक्षाही जास्त पगार मिळायला हवा. दुसऱ्या युजरने लिहिले...भाऊ, एवढ्या उंचीवर तू काम करत आहेस आणि भीती मला वाटत आहे. तिसऱ्याने लिहिले...अशा कष्टाळू लोकांकडे पण कधीच लक्ष देत नाही. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया