हिंदू धर्म हा अनेकेश्वरवादी धर्म आहे. यात माँ काली अथवा माता कालीचेही एक स्वतंत्र स्थान आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळे अचानकच गोंधळ निर्माण झाला आहे. या व्हिडिओमध्ये, एका तरुणीने टॅटू गोंदवणाऱ्याकडून आपल्या पायावर माँ कालीचा टॅटू गोंदवताना दिसत आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर, सोशल मीडियावर युजर प्रचंड भडकले अशून संताप व्यक्त करत आहेत.
खरे तर, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, संबंधित तरुणी एका टॅटू कलाकाराच्या स्टुडिओमध्ये तोंड खाली करून झोपलेली आहे आणि संबंधित कलाकार तिच्या पायांच्या मागील बाजूस माता कालीचे टॅटू गोंदवत आहे. पायावर टॅटू काढतानाचा हा व्हडिओ सोशल मीडियावर गोंधळ निर्माण करेल, याची कल्पनाही कदाचित त्या तरुणीला नसेल. या व्हिडिओवर आता इंटरनेट युजर विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत.
हा टॅटू अशा पद्धतीने दाखवण्यात आला आहे की, प्रत्येक मुलीमध्ये एक काली दडलेली असते, जी तिला कधीही कमकुवत होऊ देत नाही. टॅटू अशा प्रकारे बनवण्यात आला आहे की तो मागे चालणाऱ्या लोकांना स्पष्टपणे दिसेल. मात्र, लोकांचे म्हणणे आहे की, तो दुसऱ्या एखाद्या चांगल्या जागेवरही काढता आला असता. नेहमी कुणाच्या तरी भावनांशी खेळणे योग्य नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि लोक त्यावर संताप व्यक्त करत आहेत.