शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Bihar : 75 वर्षांत पहिल्यांदाच गावातील तरुणाला मिळाली सरकारी नोकरी, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 14:37 IST

75 वर्षांत पहिल्यांदाच गावातील तरुणाला सरकारी नोकरी मिळाल्याने गावकऱ्यांनी जल्लोष केला.

पाटणा : सध्या बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा स्थितीत जर सरकारीनोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. सरकारी नोकऱ्यांबाबत उत्तर भारतीयांमध्ये एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. खासकरून बिहारमध्ये तरुणांचा पहिला प्रयत्न सरकारी नोकरीचा असतो. परंतु बिहारमधील एक असेही गाव आहे जिथे स्वातंत्र्यानंतर एकाही व्यक्तीला सरकारी नोकरी मिळाली नाही. पण आता गावातील एका तरुणाने हा विक्रम मोडल्याने गावात जल्लोषाचे वातावरण आहे. 

बिहार राज्यातील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कटरा ब्लॉकच्या सोहागपूर गावातील तरुणाला पहिल्यांदाच सरकारी नोकरी मिळाली आहे. त्यामुळे तरूणाचे कुटुंबात आणि संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होऊनही गावातील कोणालाही सरकारी नोकरी मिळाली नव्हती. मात्र आता गावातील राकेश कुमार या तरुणाने हा विक्रम मोडून काढला असून तो आता सरकारी शिक्षक झाला आहे.

राकेश कुमार बनला शिक्षक जवळपास 2,000 लोकसंख्या असलेल्या या गावात आतापर्यंत एकाही तरूणाला सरकारी नोकरी मिळाली नव्हती. राकेश कुमार या तरूणाने मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर इथपर्यंत मजल मारली आहे. राकेशने गावात शिक्षणाची सुरुवात केल्यानंतर जिल्हा दरभंगा विद्यापीठातून एमकॉमचे (MCom) शिक्षण घेतले आणि त्यानंतर राजस्थानमधून बीएडची (B.Ed) परीक्षा उत्तीर्ण झाला. 

गावकऱ्यांनी केला जल्लोष राकेश कुमारच्या या यशामुळे गावातील नागरिक खूप खुश आहेत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर आपल्या गावातील तरूणाला सरकारी नोकरी मिळाल्याचा गावकरी आनंद साजरा करत आहेत. तसेच राकेशच्या या यशामुळे इतर तरूणांना देखील प्रेरणा मिळेल असे गावकरी सांगत आहेत. राकेश कुमार याची नियुक्ती मुझफ्फरपूर जिल्ह्यातील तुर्कीच्या प्राथमिक शाळेत झाली आहे, जिथे तो विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करेल. 

 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलBiharबिहारGovernmentसरकारjobनोकरीTeacherशिक्षक