शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम की वेडेपणा? सगळेच अवाक्; चक्क ओठांवर काढला प्रेयसीच्या नावाचा टॅटू, Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 16:15 IST

आजकाल टॅटू काढणे सामान्य बाब झाली आहे.

सोशल मीडियाच्या जगात कोण कधी व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोण कोणत्या थराला जाईल याबाबत विचार न केलेलाच बरा... आजकाल टॅटू काढणे सामान्य बाब झाली आहे. लोक हात आणि पायांपासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर टॅटू बनवतात. अनेकदा सोशल मीडियावर परदेशी नागरिकांचे भन्नाट व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत असतात, ज्यामध्ये त्यांचे संपूर्ण शरीर टॅटूने भरलेले असते. आता एका भारतीयाने कोरलेल्या टॅटूची भलतीच चर्चा रंगली आहे. त्याने चक्क ओठांच्या आतील भागात प्रेयसीचे नाव गोंदले आहे. 

सोशल मीडियावर हा जुना व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एका युजरने एक रील पोस्ट केली होती, ज्यामध्ये एक व्यक्ती त्याने बनवलेला टॅटू फ्लाँट करताना दिसत आहे. हा टॅटू त्याने हात आणि पायावर नाही तर ओठांच्या आतील भागावर गोंदला आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, एका व्यक्तीच्या ओठाच्या आतील बाजूस त्याच्या प्रेयसीचे नाव लिहिण्यात आले आहे. 'अमृता' असे या मुलीचे नाव आहे. सर्वप्रथम नाव एका सुंदर फॉन्टमध्ये लिहिलेले आहे आणि ओठांच्या आत पेस्ट केले आहे. त्याचा ठसा ओठांवर पडला की मग त्यावर टॅटू काढला जातो. शेवटी ती व्यक्ती आपले ओठ उघड करून टॅटू दाखवत आहे. हा व्हायरल व्हिडीओ आहे, त्यामुळे हा टॅटू प्रत्यक्षात गोंदवण्यात आला आहे की केवळ व्हायरल होण्याच्या उद्देशाने तो पेस्ट करण्यात आला आहे, हे ठामपणे सांगता येणार नाही. 

ओठ हा अतिशय संवेदनशील भाग आहे, त्यावर टॅटूची सुई घातली तर त्यातून रक्त येणे साहजिकच आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने मिश्किलपणे म्हटले की, मला वाटले ही कर्करोगाची जाहिरात आहे. एक म्हणाला की, आता ब्रेकअप झाले तर तोंड उघडू नकोस.  

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल