शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: विरारमध्ये तीन महिलांनी दारू पिऊन घातला गोंधळ; पोलिसाच्या हाताचा चावा घेत गणवेशही फाडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 14:57 IST

सध्या सोशल मीडियावर मुंबईच्या विरारमधील एका घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. 

Social Viral  :विरारच्या गोकुळ टाऊनशिप येथील पंखा फास्ट रेस्टारंट अ‍ॅण्ड बार येथे तीन महिलांनी दारू पिऊन गोंधळ घातला. अर्नाळा पोलिसांनी कायदेशीर कर्तव्य बजावताना अडथळा निर्माण करून दुखापत पोहोचवली म्हणून गुन्हा दाखल करत तिन्ही आरोपी महिलांना अटक केली आहे. याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेत आला आहे.  

महिला पोलिस अंमलदारासह  इतर पोलीस अधिकारी व अंमलदार घटनास्थळी पोहोचले. येथे आरोपी महिलांनी त्यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ करीत दमदाटी केली. त्यातील एका महिलेने महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या गणवेशाला पकडून ओढले आणि त्यांना धक्काबुक्की करून शर्टाची कॉलर पकडली. तिचा हात सोडवत असताना आरोपीने त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला व कोपराला जोरात चावा घेतला. या घटनेच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

मिळालेल्या माहितीनूसार, या मद्यपी महिलांनी काही कारणामुळे  तेथील बारमधील अन्य ग्राहकांशी वाद घातला. या कारणामुळे त्यांना बारमधून बाहेर हकलण्यात आलं. बारमधून बाहेर निघताच या तिघींनी भररस्त्यात गोंधळ घातला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.  पोलिसांना धक्काबुक्की करत त्यातील दुसऱ्या आरोपी महिलेने लेडीज पोलीस कॉन्स्टेबलचे केस ओढले. या वादामध्ये पोलिस अंमलदार यांना सोडविण्यासाठी आलेल्या पंखा फास्ट रेस्टॉरंटमध्ये काम करत असलेल्या महिला सुरक्षा रक्षक महिलेला देखील धक्काबुकी करून तिचा टी-शर्ट फाडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद करण्यात आली आहे. 

तर तिसऱ्या आरोपी महिलेने देखील त्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ व दमदाटी केली. या तिघींच्या ग्रुपमधील एकीने पोलीस हवालदाराच्या डोक्यात, खांद्यावर लोखंडी बादलीने मारून दुखापत करून त्यांच्या डाव्या हाताला मनगटाजवळ चावा घेऊन दुखापत केली.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाVirarविरारPoliceपोलिस