सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका खोलीत कपाटाच्या बाजूला एक लहान मुलगी खाली बसली आहे. रात्री ३ वाजता अचानक हसण्याचा आवाज आल्याने वडिलांनी दरवाजा उघडला. खोलीतील दृश्य पाहून घरच्यांना धक्का बसला.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी खोलीतील कपाटाच्या शेजारी जमिनीवर एकटी बसलेली दिसते. सुरुवातीला त्या व्यक्तीला वाटले की सगळं ठीक आहे, पण नंतर अचानक कपाटातून दोन भितीदायक हात बाहेर आले आणि मुलीच्या केसांशी खेळू लागले. हे पाहून तो व्यक्ती खूप घाबरतो आणि आपल्या मुलीकडे धावतो, पण तोपर्यंत हात गायब झाले होते.
दिल्लीत खासदारही सुरक्षित नाहीत; हाय सिक्युरिटीमध्ये चोराने महिला खासदाराची चेन खेचून काढला पळ
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी हात बाहेर येत होते तिथे फक्त एक बाहुली पडली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये व्यक्ती आपल्या मुलीला हाक मारतो आणि पकडून हलवतो, पण मुलगी कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे बसते, जणू काही तिला काहीच माहित नाही.
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर @scaryencounter नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे, याला आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये, बहुतेक नेटिझन्स आश्चर्य व्यक्त करत त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ कधी आणि कुठे रेकॉर्ड केला याबद्दल कोणतीही माहिती नाही.
नेटकऱ्यांनी बाजूला पडलेल्या बाहुलीवरती संशय व्यक्त केला आहे.