शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुधाच्या रिकाम्या पिशव्या द्या आणि पेट्रोल डिझेलवर मिळवा सूट, अनोख्या ऑफरची रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 14:13 IST

पेट्रोल-डिझेलच्या दरांनी देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये शंभरी गाठली आहे.

भिलवाडा : पेट्रोल-डिझेलच्या दरांनी (Petrol Diesel Price) देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये शंभरी गाठली आहे. वाढत्या इंधनाच्या किंमतींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. अशा परिस्थितीत राजस्थानमधील एका पेट्रोलपंपाच्या मालकाने एक भन्नाट ऑफर दिली आहे. दुधाच्या रिकाम्या पिशव्या, प्लास्टिकच्या बॉटल्स द्या आणि पेट्रोल-डिझेलवर सूट मिळवा अशा आशयाचे फलक परिसरात लावण्यात आले आहे. खरं तर पेट्रोल पंपाचे मालक अशोक कुमार मुंद्रा यांचा यामागील उद्देश्य समाजहिताचा आहे. केवळ एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी ही मोहिम राबवली जात आहे. 

दरम्यान, दुधाच्या रिकाम्या पिशव्या आणि प्लास्टिकच्या बॉटल्स देऊन इंधनावर सूट मिळणार आहे. पेट्रोलवर १ रूपया तर डिझेलवर ५० पैसे सूट दिली जाईल असे सांगितले जात आहे. १५ जुलैपासून सुरू झालेल्या या मोहिमेची मोठी चर्चा रंगली आहे. याशिवाय भिलवाडा जिल्ह्यातील प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण बोर्ड या मोहिमेचे समर्थन करत आहे. 

दुधाच्या पिशव्या देऊन पेट्रोलवर मिळवा सूट अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऑफरअंतर्गत १ लीटर पेट्रोलवर १ रूपया तर १ लीटर डिझेलवर ५० पैसे सूट मिळेल. यासाठी सारस डेअरी उघडण्यात आली आहे, गोळा केलेल्या सर्व पिशव्या आणि बॉटल्स सारस डेअरीला दिल्या जातात. तिथे या प्लास्टिकची विल्हेवाट लावली जाते. आतापर्यंत एकूण ७०० हून अधिक बॉटल्स जमा झाल्या आहेत. 

"ही मोहिम ६ महिने राबवण्याचा आम्ही विचार करत आहोत. एका महिन्यात १० हजार प्लास्टिकच्या वस्तू गोळा होतील असा आमचा अंदाज होता मात्र पावसामुळे पंपावर लोकांची ये-जा कमी आहे", अशी माहिती पेट्रोल पंपाचे मालक अशोक कुमार मुंद्रा यांनी दिली. 

 

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलPetrol Pumpपेट्रोल पंपPetrolपेट्रोलDieselडिझेलPlastic banप्लॅस्टिक बंदीRajasthanराजस्थान