शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलच! वयाच्या ३१ व्या वर्षी झाला ४८ मुलांचा बाप; धक्कादायक कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 10:56 IST

अमेरिकेतील एका व्यक्तीने स्पर्म दान करून आतापर्यंत तब्बल ४८ मुलांना जन्म दिला आहे.

Serial Sperm Donor । नवी दिल्ली : अनेकवेळा सीरियल किलर आणि सीरियल किसर यांची भूमिका असलेले चित्रपट पाहायला मिळतात. अशी भूमिका असलेले कलाकार आपल्या अनोख्या आणि धाडसी व्यक्तीरेखेमुळे सर्वांचे लक्ष वेधतात. मात्र सीरियल स्पर्म डोनर याबाबत फारच कमी प्रकरणे समोर येत असतात. अशीच एक व्यक्ती स्पर्म डोनर म्हणून जगभर चर्चेत आली आहे. स्पर्म दान करून हा व्यक्ती आतापर्यंत तब्बल ४८ मुलांचा बाप झाला आहे. अलीकडेच त्याने दान केलेल्या स्पर्ममुळे ब्रिटनमध्ये एका मुलीचा जन्म झाला आहे. 

स्पर्म दान सुरूच ठेवणार या स्पर्म डोनरचे नाव कॅल गॉडी असे आहे. ३१ वर्षीय कॅल गॉडी अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात राहत असून तो अकाउंटंट म्हणून काम करतो. ४८ वेळा स्पर्न दान केलेला गॉडी म्हणतो की, इथून पुढे देखील स्पर्म दान करणार असून जोपर्यंत महिलांना याची गरज आहे तोपर्यंत हे सुरूच ठेवणार आहे. 

ऑक्टोबर २०२१ मध्ये गॉडी युरोपीय देशांमध्ये फिरायला गेला होता, तिथे त्याने एका लेस्बियन कपलला स्पर्म दान केले होते. त्या महिलेने इंस्टाग्रामच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधला आणि स्पर्मची मागणी केली. २७ जून रोजी लेस्बियन कपलच्या घरी एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले असून महिलेने गॉडीला बाळाचा फोटो पाठवला असल्याची माहिती गॉडीने दिली. पेशाने एक अकाउंटंट असलेल्या गॉडीने सांगितले की, "माझा एक मुलगा ब्रिटनमध्ये आहे हे ऐकून मला आनंद झाला आहे." 

२०१४ पासून ही मोहीम सुरूकॅल गॉडीने दिलेल्या माहितीनुसार, त्याने या अभियानाची सुरूवात २०१४ पासून केली आहे. सर्वप्रथम कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या एका लेस्बियन कपलला स्पर्म दान केले होते. डेटिंग आणि रिलेशनशिपममध्ये आपली फसवणूक झाल्याचे त्याने सांगितले, त्यामुळेच त्याने स्पर्म दान करण्यास सुरूवात केली. लक्षणीय बाब म्हणजे कॅल गॉडीने ज्या महिलांना स्पर्म दान केले आहे त्यांचा एक व्हॉट्सप ग्रुप तयार केला असून यामध्ये जवळपास ४० महिलांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाAmericaअमेरिका