शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

लाइट जाताच नवऱ्यांच्या घरच्यांनी केला आरडाओरडा; मुलीकडील लोकांनी मारहाण करत लग्नाला दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 17:28 IST

उत्तर प्रदेशातील कांठ भागातील जोरवान गावचे रहिवासी रवींद्र पाल यांनी त्यांचा मुलगा रजनीशचा विवाह पिलीभीत जिल्ह्यातील बिलसांडा भागातील बिल्हारा गावातील रहिवासी मोहनलाल यांची मुलगी स्वाती हिच्यासोबत ठरवला होता.

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे लग्नादरम्यान जनरेटर बंद असल्याच्या शुल्लक कारणावरून लग्नातील वर पक्ष आणि वधू पक्षामध्ये जोरदार हाणामारी झाली. दोन्हीही बाजूंनी झालेल्या हाणामारीमध्ये लाठ्या-काठ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला, ज्यामध्ये वऱ्हाडी मंडळीतील अनेक लोक जखमी झाले आहेत. एका तरूणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच नववधूने लग्न करण्यास नकार दिला आहे, ज्यानंतर दोन्हीही बाजूच्या मंडळीनी पोलीस स्थानकात धाव घेतली. पोलीस स्टेशनचे प्रभारी अचल सांगतात की, दोन्ही पक्ष कोणतीही कारवाई न करता आपापल्या घरी गेले. ही घटना पोलीस स्टेशन बिलसांडा परिसरातील आहे. 

उत्तर प्रदेशातील कांठ भागातील जोरवान गावचे रहिवासी रवींद्र पाल यांनी त्यांचा मुलगा रजनीशचा विवाह पिलीभीत जिल्ह्यातील बिलसांडा भागातील बिल्हारा गावातील रहिवासी मोहनलाल यांची मुलगी स्वाती हिच्यासोबत ठरवला होता. वऱ्हाड ८ जुलै रोजी रात्री वधु निवासस्थानी पोहोचले. विवाह समारंभातील एका कार्यक्रमादरम्यान अचानक जनरेटर बंद पडल्याचे बोलले जात आहे. याच किरकोळ कारणावरून दोन्ही पक्षांमध्ये वादावादी सुरू झाली आणि वाद वाढला. 

वऱ्हाडी मंडळीला केली मारहाणमुलीकडील लोकांनी लग्नात आलेल्या वऱ्हाडी मंडळीला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली, ज्यामध्ये नवरदेव आणि त्याचे काका राम किशोर आणि मित्र दीपक यादव हे मारहाणीमुळे गंभीर जखमी झाल्याचा आरोप आहे. दीपकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळींनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि कारवाई करण्याची मागणी केली. 

दुसरीकडे नवरीने देखील पोलीस स्थानकात धाव घेतली आणि सासरच्या मंडळीने आपल्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आणि तिने लग्नास नकार दिला. दोन्हीही पक्षातील मंडळीनी पोलीस स्थानकात धाव घेतल्यानंतर पोलीस स्टेशनचे प्रभारी अचल यांनी म्हटले की, दोन्ही पक्ष कोणतीही केस रजिस्टर न करता आपापल्या घरी निघून गेले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलUttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न