डोळ्यांनाही भ्रमित करणारे म्हणजेच ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो सध्या भलतेच ट्रेंडमध्ये असतात. आता एक असा फोटो आहे, ज्याने लोकांच्या डोक्याचे दही केलेले आहे. या फोटोत खूप सारी घुबड आहेत. त्यात खुठेतरी एक मांजर लपलेली आहे. त्या मांजराला शोधायचे आहे.
जर तुम्ही हे मांजर १० सेकंदात शोधले तर तुम्ही लपलेल्या वस्तू शोधण्य़ात माहिर आहात हे स्पष्ट होईल. तुम्हाला खरोखर मांजर शोधायचे असेल तर हे चित्र नीट निरखून पहा. कोणताही कोपरा सोडू नका. अर्थातच, लक्ष केंद्रित करणे देखील महत्त्वाचे आहे. कारण लक्ष जरा जरी विचलित झाले तरी तुम्हाला तुमच्या डोळ्यांसमोर असलेले मांजर देखील दिसणार नाही.