खरे तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे लोकांना जोडण्याचे एक उत्तम माध्यम होऊ शकते. मात्र, काही लोक विकृ कृत्यांसाठीदेखील या प्लॅटफॉर्मचा वापर करताना दिसतात. अशीच एक घटना अमेरिकेतील फ्लोरिडातून समोर आली आहे. येथील एका महिला इन्फ्लुएन्सरचे घृणास्पद कृत्य जाणून तुम्हालाही धक्का बसेल. या महिलेला तिच्या पाळीव कुत्र्यासोबत सेक्स केल्याबद्दल आणि या घटनेचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. या महिलेचे नाव लोगन गुमिन्स्की असे आहे. ती २७ वर्षांची आहे. ती स्वतःला 'डॉग मॉम' म्हणवते. सोशल मीडियावर तिचे जवळपास १५,००० फॉलोअर्स आहेत.यासंदर्भात, न्यूज१८ ने दिलेल्या वृत्तानुसार, जानेवारी महिन्यात एका अज्ञात व्यक्तीने संबधित महिलेच्या इंस्टाग्राम पेजवर आक्षेपार्ह मजकूर असल्याची तक्रार पोलिसांत केली. तक्रार मिळाल्यानंतर महिलेविरुद्ध तपास सुरू झाला. चौकशीदरम्यान, तिच्या इंस्टाग्राम पेजवर अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो आढून आले. तिची चौकशी केली असता, आपण पैशासाठी असा कंटेन्ट तयार करतो. एवढेच नाही तर, आपण आणखी एका कुत्र्यासोबत लैंगिक कृत्य करतानाचा व्हिडिओ तयार केला आहे. मात्र, अद्याप तो सोशल मीडियावर पोस्ट केलेला नाही. सध्या या महिलेविरोधात न्यायालयात खटला सुरू आहे. तसेच तिला १० हजार डॉलर्सच्या जातमुचलक्यावर सोडण्यात आले आहे. पोलिसांनी तिला २१ मार्च रोजी अटक केली होती. तिच्याविरुद्ध दोन गंभीर गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यात प्राण्यांसोबत लैंगिक संबंध ठेवणे आणि तसे व्हिडिओ सार्वजनिक करण्याचा समावेश आहे.
महिला इन्फ्लुएन्सरचं घृणास्पद कृत्य; कुत्र्यासोबत सेक्स केला, व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवर टाकला अन्...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 17:33 IST