शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डिलिव्हरी बॉय बनला देवदूत! आग लागलेल्या घरात शिरून ५ चिमुकल्यांचा वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 17:35 IST

सध्या एक पिज्जा डिलिव्हरी बॉय त्याच्या कामगिरीमुळे जगभर चर्चेत आहे.

नवी दिल्ली

सध्या एक पिज्जा डिलिव्हरी बॉय त्याच्या कामगिरीमुळे जगभर चर्चेत आहे. कारण या पिज्जा डिलिव्हरी बॉयने स्वत:चा जीव धोक्यात घालून आगीचा सामना करत घरात अडकलेल्या ५ लहानग्यांचा जीव वाचवला आहे. खरा हिरो कसा असावा याचा प्रत्यय देणारी ही घटना खूप चर्चेचा विषय बनली आहे. निकोलस बॉस्टिक नावाच्या या २५ वर्षीय पिज्जा डिलिव्हरी बॉयने आपल्या जीवाची पर्वा न करता दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

दुसऱ्याच्या जीवासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे मोजकेच असतात. या व्हिडीओवर अशाच प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पिज्जा डिलिव्हरी बॉयच्या या धाडसाची सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की डिलिव्हरी बॉय कसा ५ लहान मुलांना आगीने होरपळलेल्या घरातून सुखरूप बाहेर काढत आहे. 

डिलिव्हरी बॉय बनला देवदूत ही संपूर्ण घटना अमेरिकेतील इंडियाना इथे घडली आहे, जिथे अचानक लागलेल्या आगीमध्ये एक घर जळून खाक झाले. यानंतर घटनास्थळावरून जात असलेला पिज्जा बॉय आपल्या जिवाची पर्वा न करता घरात शिरतो आणि ५ लहान मुलांचे जीव वाचवतो. मन विचलित करणारी दृश्ये व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत, आगीचा भडका उडत असताना देखील निकोलस नावाच्या डिलिव्हरी बॉयने आपला जीव धोक्यात घालून लहानग्यांना सुखरूप बाहेर काढले. 

माहितीनुसार, पिज्जा डिलिव्हरी बॉय निकोलस आग लागलेल्या घराशेजारून जात होता, तेव्हा त्याची नजर आगीच्या भडक्याकडे गेली असता त्याने घटनास्थळी धाव घेतली. लक्षणीय बाब म्हणजे आगीने जळत असलेल्या घरात शिरून त्याने लहानग्यांना आपल्या खाद्यांवर घेऊन बाहेर काढले. या घटनेचा संपूर्ण थरार तिथे असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी कैद केला आहे. LafayetteINPolice या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाAmericaअमेरिकाfireआग