शहरं
Join us  
Trending Stories
1
रुपयाची ऐतिहासिक घसरण! डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ९० च्या खाली, तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल?
2
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
3
दिल्ली महापालिकेच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला; भाजपाच्या २ जागा घटल्या, काँग्रेसला फायदा
4
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
5
मित्रांची पार्टी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले दोन अनोळखी व्यक्ती; हत्याकांडाच्या दिवशी प्रियंकासोबत काय घडलं?
6
तुटलेले दात, चॉकलेट अन् मृतदेह; लाल सुटकेसमध्ये होता ८ वर्षीय चिमुकला, उघडताच उडाला थरकाप
7
राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये प्रशिक्षणादरम्यान इंदिरा गांधी कालव्यात लष्कराचा टँक बुडाला; एका जवानाचा मृत्यू
8
सूनमुख विधी! सुचित्रा बांदेकरांनी आरशात पाहिला सूनेचा चेहरा, सोहम-पूजाच्या लग्नातील खास क्षण
9
किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये होणार का? सरकारने लोकसभेत दिलं उत्तर
10
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
11
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
12
अखेर केडीएमसीने मॅनहोलमध्ये पडलेेल्या 'त्या' मुलाच्या मृत्युची जबाबदारी घेतली, पालकांना देणार सहा लाख
13
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
14
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
15
हवा कुठे, किती खराब? अचूक माहिती मिळणार; BMC हवा गुणवत्ता मोजण्यासाठी ‘मानस’ उपक्रम राबवणार
16
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
17
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
18
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
19
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
20
Palash Muchhal: पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
Daily Top 2Weekly Top 5

ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 11:54 IST

Flood Viral Video: उत्तराखंडमध्ये मागील काही दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी परिस्थिती कठीण बनली असून, एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या फिरत आहे. 

Rain Viral Video: उत्तराखंडमध्ये पावसाने कहर केला. मागील काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये संततधार पाऊस सुरू असून, उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला. उत्तरकाशी जिल्ह्यातील मोरी तालुक्यात असलेल्या लिवाडी-फिताडी मार्गावर गाडी पुराच्या पाण्यात अडकली. पाणी वाढत असल्याचे बघून गाडीचा चालक टपावर आला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतोय, तो उफनती नदीतील आहे. गाडी घेऊन जात असताना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आणि गाडी अडकली. गाडी वाहत जाऊन एका खडकाजवळ अडकली. गाडी फक्त चालकच होता. 

गाडीच्या छतावर जीव मुठीत घेऊन बसला

नदीच्या पाणी वाढत असल्याचे बघून चालक बाहेर आला आणि छतावर गेला. त्याने नदीच्या प्रवाहातून पडण्याचाही प्रयत्न केला. पण, पाणी वेग खूप असल्याने तो छतावरच बसला. ही माहिती स्थानिक लोकांना मिळाली. त्यांनी प्रशासनाला याची माहिती दिली. 

गावकऱ्यांमुळे मिळाले जीवदान

प्रशासन आणि पोलीस मदतीसाठी येण्याची वाट न बघता गावकऱ्यांनी त्या चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. दोरखंड त्याच्या दिशेने फेकण्यात आले. त्यानंतर त्याला गावकऱ्यांनी सुखरुप बाहेर काढले. गावकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे चालकाला जीवदान मिळाले. 

चारधाम यात्रा स्थगित

हवामान विभागाने पुढील काही दिवस उत्तराखंडमधील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आधीच व्यवस्था कोलमडली असून, आगामी काळात सावधगिरी म्हणून चारधाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. 

डोंगर, नद्या या भागात सतर्कता बाळगण्याचे आदेश सरकारने प्रशासनाला दिले आहेत. पर्यटक आणि स्थानिकांनाही धोक्याच्या ठिकाणी जाण्यापासून टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलUttarakhandउत्तराखंड